Virat Kohli | शतक एक फायदे अनेक, विराटला सेंच्युरी झळकावत अनेक रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

| Updated on: Mar 22, 2021 | 3:01 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 23 मार्चपासून एकदिवसीय (india vs england odi series 2021) मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) शतक झळकावत अनेक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

Virat Kohli | शतक एक फायदे अनेक, विराटला सेंच्युरी झळकावत अनेक रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 23 मार्चपासून एकदिवसीय (india vs england odi series 2021) मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) शतक झळकावत अनेक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
Follow us on

पुणे : विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज. विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रम स्थापित केले आहेत. विराटने आपल्या नेतृत्वात इंग्लंडचा कसोटी आणि टी 20 मालिकेत पराभव केला आहे. आता उभयसंघात 23 मार्चपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. विराट क्रिकेटमध्ये सक्रीय फलंदाजांपैकी सर्वाधिक शतकं लगावणारा फलंदाज आहे. मात्र विराटने 15 महिन्यांपासून एकही शतक लगावलेलं नाही. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे 22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे विराटला इंग्लंड (india vs england odi series 2021) विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शतक झळकावत शतकाचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. तसेच विराटला शतकासह अनेक विक्रमांची बरोबरी करण्याची संधी आहे. (india vs england odi series 2021 virat kohli has a chance to break many records by scoring a century)

काय आहेत रेकॉर्ड?

विराटला शतक झळकावत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करण्याच्या रेकॉर्ड पॉन्टिंगच्या नावे आहे. पॉन्टिंगने 41 शतक लगावले आहेत. त्यामुळे विराटने 42 वं शतक पूर्ण केल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक लगावणारा पहिला कर्णधार ठरेल.

सचिनच्या विक्रमाची बरोबरी

विराटला 1 शतकासह सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची साधण्याची संधी आहे. भारतात सर्वाधिक शतक मारण्याचा विक्रम सचिनच्या नावे आहे. सचिनने भारतात 20 शतक पूर्ण केले आहेत. तर विराट सचिनपासून 1 शतक दूर आहे. त्यामुळे विराटने शतक लगावल्यास पॉन्टिंगचा विक्रम मोडीत काढत सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी साधता येईल.

युवराजसोबत बरोबरी

विराटने या मालिकेत शतक लगावल्यास हे त्याचं इंग्लंड विरुद्धचं चौथं शतक ठरेल. त्यासह तो युवराज सिंहच्या विक्रमाची बरोबरी साधेल. युवराजने इंग्लंड विरुद्ध 4 सेच्ंयुरी लगावल्या आहेत. तर विराटच्या नावे इंग्लंड विरुद्ध 3 शतकांची नोंद आहे.

विराटची शानदार कामगिरी

विराटने इंग्लंड विरुद्धच्या 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत अफलातून कामगिरी केली. विराट टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने या 5 सामन्यात 3 नाबाद अर्धशतकांसह 231 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. विराट सध्या जोरदार फॉर्मात आहे. त्यामुळे विराटकडून त्यांच्या चाहत्यांना शतकाची अपेक्षा असणार आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO | रनमशीन विराट कोहलीची 15 महिन्यांपासून शतकाची पाटी कोरीच

Virat Kohli | कर्णधार विराट कोहली ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’चा मानकरी

(india vs england odi series 2021 virat kohli has a chance to break many records by scoring a century)