Ind vs Eng T20 : भारताच्या ताफ्यात 19 खेळाडू, प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी?

| Updated on: Mar 09, 2021 | 12:40 PM

भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यातील टी 20 मालिकेला (T 20 Series) 12 मार्चपासून सुरुवात होत आहे.

Ind vs Eng T20 : भारताच्या ताफ्यात 19 खेळाडू, प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी?
भारतीय संघ
Follow us on

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यातील टी 20 मालिकेला (T 20 Series) 12 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या सिरीजसाठी भारताच्या ताफ्यात 19 खेळाडू आहेत. त्यामुळे कुणाला संधी द्यायची? यावरुन संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे. (India Vs England Playing Eleven indian team management)

इंग्लंडविरुद्धच्या 5 टी 20 सामन्यांसाठी भारतीय संघात 19 खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मोठा पेच आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी बॅलन्स प्लेइंग 11 आणि उर्वरित दोन सामन्यांसाठी काही बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच वर्षी भारतात टी 20 वर्ल्ड कप  (T 20 World Cup) पार पडणार आहे. त्याची तयारी आतापासून सुरु आहे. इंग्लंडविरुद्धची 5 सामन्यांची टी 20 मालिका ही त्याचीच टेस्टिंग असणार आहे. पाच सामन्यांची मालिका असल्याने खेळाडूंना संधीही देण्यास पुरेसा वाव मिळणार आहे तसंच भारतीय संघ व्यवस्थापन काही प्रयोगही करु पाहत आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनापुढे मोठा पेच

संघात अनेक दिग्गज खेळाडू तसंच नवखे पण प्रतिस्पर्धी टीमचा धु्व्वा उडवण्यास सक्षम असलेले नवोदित खेळाडूंचा समावेश आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक क्रमांकावर दोन-दोन ऑप्शन आहेत. म्हणजेच एका जागेसाठी दोन दावेदार आहेत. यामुळे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri), कर्णधार विराट कोहली (Virat kohli) आणि बोलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) काय निर्णय घेतात, याकडे सगळ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे.

इंग्लंडविरुद्ध खेळताना पहिल्या तीन सामन्यांसाठी यश महत्त्वाचं आहे. कारण उर्वरित दोन सामन्यांसाठी संघ व्यवस्थापनाला काही बदल करण्याची संधी मिळेल. याचाच अर्थ पहिल्या तीन सामन्यांसाठी अतिशय बॅलन्स असलेली टीम कर्णधार कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री निवडतील. आणि उर्वरित दोन सामन्यांत काही बदल करतील तसंच नवे प्रयोग करतील.

सलामीवीर कोण? शिखर धवन-रोहित शर्मा -के .ए. राहुल

आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि डावखुरा शिखर धवन हे समीकरण झालं होतं. मात्र गेले काही दिवस के.एल.राहुलचं धावांचं सातत्य आणि आयपीएलमधली कामगिरी राहिली तर नक्कीच सलामीवीरांध्ये स्पर्धा वाढल्याचं जाणवतं. धवनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 150 रन्सच्या आसपास रन्स बनवले. त्यामुळे शिखरला ओपन करण्याची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर रोहितला सध्या तरी कोण तोडीस तोड नाहीय. त्यामुळे रोहितची जागा फिक्स आहे. तर मग प्रश्न उरतो राहुलचा… जर राहुलला संघात घ्यायचं असेल तर राहुलला कोणच्या नंबरवर संघ व्यवस्थापन खेळायला लावणार?, हा मोठा प्रश्न आहे.

क्रमांक तीन, पाच आणि सहा फिक्स, चौथ्या क्रमांकावर स्पर्धा

कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमाकांवर खेळतो. तर पंत आणि हार्दिक पांड्या अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर खेळतात. मग अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकाचं स्थान उरतं. या क्रमाकांवर राहुल खेळेल काय? असा प्रश्न विचारताना या क्रमाकांवर खेळण्यासाठी सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर देखील उत्सुक आहे.

बोलिंगमध्येही स्पर्धा

बोलिंगमध्येही भारताकडे बरेच ऑप्शन आहेत. भुवनेश्वर कुमार बऱ्याच दिवसांतून संघात पुनरागमन करत आहे. भुवीची दीपक चहर आणि शार्दुल ठाकुरबरोबर स्पर्धा असेल. खरंतर भुवीचा अनुभव आणि शेवटच्या ओव्हरमधील प्रभावी गोलंदाजी यामध्ये तो चहरला मागे टाकेल. पण एवढ्यात त्याने मुश्ताक अली ट्रॉफीशिवाय अधिक मॅचेस खेळलेल्या नाहीत. युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलला टी 20 निर्विवादपणे स्थान मिळू शकते. तर दुसरीकडे टी नटराजन आणि नवदीप सैनी आपला जलवा दाखवण्यास उत्सुक आहेत.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम :

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

हे ही वाचा :

India vs England T 20I | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत ‘हा’ खेळाडू मॅचविनर ठरणार, व्हीव्हीएस लक्ष्मणची भविष्यवाणी