Rohit Sharma : वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडण्यासाठी हिटमॅन रोहित शर्मा सज्ज

| Updated on: Mar 23, 2021 | 11:28 AM

तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या रोहितच्या (Rohit Sharma) निशाण्यावर आता वीरेंद्र सेहवागचा (Virendra Sehwag) विक्रम आहे.

Rohit Sharma : वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडण्यासाठी हिटमॅन रोहित शर्मा सज्ज
Rohit Sharma
Follow us on

पुणे : टीम इंडियाचा तडाखेबंद फलंदाज रोहित शर्माचा (Rohit Sharma) जबरदस्त फॉर्म सुरु आहे. इंग्लंडविरोधातही रोहितची बॅट चांगलीच बोलली. अखेरच्या टी ट्वेन्टी सामन्यात रोहितने 34 बॉलमध्ये 64 रन्स केले. रोहितच्या खेळीत चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या रोहितच्या निशाण्यावर आता वीरेंद्र सेहवागचा (Virendra Sehwag) विक्रम आहे. (india Vs England Rohit Sharma record Virendra Sehwag)

भारताचा तिसरा यशस्वी ओपनर बनू शकतो रोहित

पुण्यातील एमसीए स्टेडियमवर जर रोहित शर्माने 93 धावा केल्या तर भारताचा तिसरा यशस्वी ओपनर म्हणून रोहितची नोंद होऊ शकते. याचसोबत ओपनर म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये रोहित शर्मा सेहवागला पाठीमागे टाकू शकतो. रोहित शर्माने ओपनर बॅट्समन म्हणून वन डे इंटरनॅशनलमध्ये 7148 रन्स केले आहेत.

सर्वोच्च स्थानी सचिन तेंडुलकर

वीरेंद्र सेहवागच्या नावावर ओपनर बॅट्समन म्हणून 7 हजार 240 रन्स आहेत. भारतातर्फे ओपनर बॅट्समन म्हणून सर्वाधिक रन्स सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. वनडे क्रिकेटमध्ये ओपनर बॅट्समन म्हणून सचिनच्या नावावर 15 हजार 310 रन्स आहेत.

दुसऱ्या स्थानी सौरव गांगुली

तर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा नंबर लागतो. त्याने ओपनर बॅट्समन म्हणून 9 हजार 146 रन्स ठोकले आहेत. ओपनिंग बॅट्समन म्हणून दादाची अनेक वेळा दादागिरी चालायची. प्रतिस्पर्धी बोलर्सवर तो तुटून पडायचा. त्याच्या स्टेडिअमच्या बाहेर मारलेल्या षटकारांची आणखीही क्रिकेट रसिक आठवण काढतात.

पुण्यात पहिला एकदिवसीय सामना

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (23 मार्च) पहिला एकदिवसीय (India vs England 1st ODI) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमध्ये हा सामना पार पडणार आहे.

टीम इंडियाला नंबर 1 होण्याची संधी

टीम इंडियाला या मालिकेत क्रमवारीत अव्वल क्रमांक गाठण्याची संधी आहे. आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडिया दुसऱ्या तर इंग्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. भारताला नंबर 1 होण्यासाठी ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकावी लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया नंबर 1 होण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडची टीम

इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, जॅक बॉल आणि डेव्हिड मलान.

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

(india Vs England Rohit Sharma record Virendra Sehwag)

हे ही वाचा :

India vs England, 1st Odi | पहिल्या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीची मोठी घोषणा,रोहित-शिखर सलामीला येणार

India vs England Odi Series 2021 | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, एकूण 100 वेळा आमनेसामने, कोण वरचढ, कोण कमजोर?