विराट कोहली पहिल्या वनडेला मुकण्याची शक्यता…

| Updated on: Jul 11, 2022 | 10:57 PM

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून फॉर्मशी झगडत आहे. आता त्यांच्यासमोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेतून तो बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे विराटसोबतच टीम इंडियासाठीही हा धक्का आहे.

विराट कोहली पहिल्या वनडेला मुकण्याची शक्यता...
विराट कोहली
Follow us on

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका (IND vs ENG) मंगळवारपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे होत आहे. याआधी टी-20 मालिका भारतीय संघाने 2-1 ने जिंकली होती. या गोष्टी सुरू असतानाच आता एक भारतीय संघासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर राहण्याची शक्यता आहे. फॉर्मशी झुंजणारा विराट टी-20 मालिकेतील दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा एक भाग होता.

विराट जखमी झाला

टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान विराट कोहलीला ही दुखापत झाली होती. त्यामुळे विराट कोहलीच्या मांडीचा दुखणे वाढले आहे. सामन्यापूर्वी संघाच्या सराव सत्रालाही तो उपस्थित राहिला नव्हता. त्यामुळे बीसीसीआयच्या सूत्राच्या माहितीनुसार गेल्या सामन्यात विराटला कंबरदुखीचा त्रास जाणवला होता, मात्र त्याला हे फिल्डींग करताना त्रास झालेला की, इतर वेळी ते मात्र सांगण्यात आले नाही. त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज असल्याने तो उद्याचा पहिला वनडे खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

विराट सध्या फॉर्ममध्ये नाही

विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतरही त्याने चांगली कामगिरी केली होती, मात्र त्याला शतक करता आले नव्हते. त्यामुळे त्याचा फॉर्म यंदा खराब झाला आहे. त्याने 17 सामान्यांमध्ये जवळपास 26 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-29 मध्येही त्याची बॅट शांत राहिली होती. त्यामुळे त्याला संघातून वगळण्याचीही मागणी होत आहे.

वेस्ट इंडिजमध्येही वनडे खेळणार नाही

भारतीय संघ आता इंग्लंडनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तेथे या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने होणार आहे. यावेळी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून कोहलीने ऑगस्ट 2019 पासून या फॉरमॅटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही आहे.