मुंबई : हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी एक्का मानला जातो. मर्यादित षटकांच्या सामन्यातील सर्वात धडाकेबाज फलंदाज अशी त्याची ओळख आहे. हार्दिक आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर एका षटकाच्या आत कसलीही मॅच पलटवण्याची क्षमता बाळगतो. इंग्लंड विरोधात 12 मार्चपासून सुरु होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी – 20 सिरीजसाठी भारतीय संघाचा हा स्टार ऑलराऊंडर पूर्णपणे तयार आहे.(A video from Hardik Pandya on Twitter before the T20 match against England)
हार्दिक पांड्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या बँटिंग आणि बॉलिंगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो अनेक जबरदस्त शॉट्स लगावताना दिसत आहे. हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो नेटमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. तसंच या व्हिडीओमध्ये तो अनेक मोठे शॉट्स मारताना दिसत आहे.
Preparation done ✅??
Can’t wait to get on the field on 12th ? pic.twitter.com/Nyr6Bys2EF— hardik pandya (@hardikpandya7) March 9, 2021
हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘तयारी झाली आहे. आता 12 मार्च रोजी मैदानावर जाण्यासाठी वाट पाहू शकत नाही’. भारतीय संघाच्या या ऑलराऊंडरने ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत जबरदस्त बॅटिंग केली होती आणि भारतीय संघाला टी – 20 सिरीजमध्ये विजय मिळवून दिला होता. त्यानंतर हार्दिकने कोणताही सामना खेळलेला नाही. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असं सांगितलं जाऊ शकतं की, हार्दिक जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तयार आहे.
इंग्लंडविरोधात खेळल्या जाणाऱ्या टी-20 सिरीजसाठी सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल तेवतिया यांसारख्या युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. तर कसोटी सामन्यात दमदार प्रदर्शन करणाऱ्या ऋषभ पंत आणि भुवनेश्वर कुमार यांचं संघात पुनरागमन झालं आहे. बॉलिंगमध्ये टी नटराजन, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. तर फास्टर बॉलर जसप्रीत बुमराहला टी – 20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
पृथ्वी शॉची 185 धावांची धमाकेदार खेळी, धोनी आणि विराटचा विक्रम मोडीत
Sourav Ganguly : रिषभ पंतची धोनीशी तुलना, सौरव गांगुलीची खोचक कमेंट, म्हणतो…
A video from Hardik Pandya on Twitter before the T20 match against England