IND vs ENG 2nd T20 : भारत आणि इंग्लंडचा संभाव्य संघ, पिच रिपोर्ट काय?, मॅच कधी? कुठे? केव्हा?

| Updated on: Mar 14, 2021 | 12:33 PM

 टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG 2nd T20) यांच्यात आज (14 मार्च) दुसरा टी 20 सामना पार पडणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा दुसरा सामना पार पडेल.

IND vs ENG 2nd T20 : भारत आणि इंग्लंडचा संभाव्य संघ, पिच रिपोर्ट काय?, मॅच कधी? कुठे? केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (india vs england t 20 series) दुसरा टी 20 सामना आज (14 मार्च) खेळवण्यात येणार आहे.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG 2nd T20) यांच्यात आज (14 मार्च) दुसरा टी 20 सामना पार पडणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा दुसरा सामना पार पडेल. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारत विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल तसंच पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा भारत पूरेपूर प्रयत्न करेल. (India Vs England t20 Match pitch report playing XI Live Streaming)

भारतीय संघाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल?

भारताला पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. रोहितच्या अनुपस्थितीत खेळताना त्याची उणीव भारतीय संघाला पावलोपावली जाणवली. दुसऱ्या सामन्यात रोहितचा संघात समावेश होऊ शकतो. तर सुर्यकुमार यादवला देखील संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. संघातून नेमका डच्चू कुणाला मिळू शकतो आणि संधी कुणाला मिळू शकते, एकंदरितच भारतीय टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार विराट कोहली काय निर्णय घेतात, याकडे सगळ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष आहे.

पीच रिपोर्ट काय सांगतो?

दुसऱ्या टी 20 मध्ये नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. टॉस जिंकणारी टीम पहिल्यांदा बोलिंग करण्यास उत्सुक असेल. दुसऱ्या डावात फलंदाजी करणं या पीचवर सोपं असेल, या एकंदरित पीच रिपोर्ट आहे.

पहिल्या टी 20 मध्ये टॉस जिंकून इंग्लंडने भारताला बॅटिंग करण्यास सांगितलं होतं. तसंच भारतीय गोलंदाजांना सुरुवातीला पीचकडून मदत मिळाली तसंच स्पीनर्सला पिचची चांगली साथ मिळाली. मात्र भारताला स्कोअर खूपच कमी असल्याने भारतीय बोलर्स इंग्लंडला रोखू शकले नाहीत.

सामना किती वाजता सुरु होणार?

या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात येणार आहे.

सामना कुठे पाहता येणार?

या संपूर्ण मालिकेतील लाईव्ह सामने हे स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. तसेच www.tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

प्रेक्षकांना संधी असणार का?

दुसऱ्या सामन्यात स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांना मैदानात उपस्थित राहता येणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता ही एकूण 1 लाख 32 इतकी आहे. त्यानुसार एकूण 66 हजार चाहत्यांना उपस्थितीत राहता येणार आहे.

भारत संभाव्य प्लेइंग XI: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड संभाव्य प्लेइंग XI: जॉनी बेयरेस्टो, जेसन राय, डेविड मलान, ओयन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, सैम कुरेन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड, आदिल रशीद

(India Vs England t20 Match pitch report playing XI Live Streaming)

हे ही वाचा :

Ind Vs Eng 2nd T20 : टीम इंडिया जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार, पराभवाचा वचपा काढणार?