Shardul Thakur | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत ‘पालघर एक्सप्रेस’ सुस्साट, सलग 2 सामन्यात निर्णायक कामगिरी, पाहा शार्दुलची आकडेवारी

| Updated on: Mar 21, 2021 | 6:04 PM

इंग्लंड विरुद्धच्या (india vs england t20 series 2021) टी 20 मालिकेतील एकूण 5 सामन्यात शार्दुल ठाकूरने (shardul thakur) 8 विकेट्स घेतल्या.

Shardul Thakur | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत पालघर एक्सप्रेस सुस्साट, सलग 2 सामन्यात निर्णायक कामगिरी, पाहा शार्दुलची आकडेवारी
इंग्लंड विरुद्धच्या (india vs england t20 series 2021) टी 20 मालिकेत शार्दुल ठाकूरने (shardul thakur) एकूण 5 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या.
Follow us on

अहमदाबाद : भारताने इंग्लंडला टी 20 मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या (India vs England T20 series 2021) सामन्यात 36 धावांनी पराभूत केलं. यासह भारताने टी 20 मालिका 3-2 च्या फरकाने खिशात घातली. भारताचा हा सलग 6 वा टी 20 मालिका विजय ठरला. टीम इंडियाने या 5 सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरी केली. केएल राहुलचा अपवाद वगळता सर्वच खेळाडूंनी विजयात योगदान दिलं. पण एक खेळाडू असा आहे, ज्याने चौथ्या आणि पाचव्या सामन्यातील चित्र पालाटलं आणि सामना भारताच्या बाजूने झुकवला. तो म्हणजे मराठमोळा ‘पालघर एक्सप्रेस’ (Shardul Thakur) शार्दुल ठाकूर. (india vs england t20 series 2021 shardul thakur game changing bowling)

शार्दुलने या मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. मालिकेतील 3 सामने खेळून झाले होते. यामध्ये भारतीय संघ 1-2 ने पिछाडीवर होता. मालिका जिंकण्यासाठी भारताला सलग 2 सामने जिंकायचे होते. या दोन्ही सामन्यात शार्दुलने आपल्या बोलिंगने धमाकेदार कामगिरी करत भारताला सामन्यात परत आणलं. शार्दुलने चौथ्या आणि पाचव्या आणि सामन्यात एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत मॅच टीम इंडियाला जिंकवून दिली.

शार्दुलने नक्की काय केलं?

मालिकेतील चौथा सामना. भारतासाठी ‘करो या मरो’चा स्थिती होती. इंग्लंड टीम इंडियावर वरचढ ठरत होती. भारताने इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंड 4 विकेट गमावून 140 धावांवर स्थित स्थितीत होती. बेन स्टोक्स आणि कर्णधार इयोन मॉर्गन ही आक्रमक आणि अनुभवी जोडी मैदानात होती. भारत सामन्यात बॅक फुटवर होता.

इंग्लंडला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 46 धावांची आवश्यकता होती. शार्दुल सामन्यातील 17 वी ओव्हर टाकायला आला. भारताला विकेट्सची आवश्यकता होती. शार्दुलने ती भूमिका योग्यपणे पार पाडली. त्याने या दोन्ही फलंदाजांना सलग 2 चेंडूत बाद केलं. सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकला. शार्दुलने टाकलेली 17 वी ओव्हर सामन्याचा टर्निंग पॉंईट ठरली. यासह भारताने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. शार्दुलने या सामन्यात एकूण 4 ओव्हरमध्ये 42 धावा देत निर्णायक क्षणी 3 विकेट्स घेतल्या.

5 व्या सामन्यातही शार्दुलचा भेदक मारा

पाचव्या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे आव्हान मिळाले. या विजयी धावांचं पाठलाग करताना इंग्लंडने 14.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 140 धावा केल्या होत्या. आता विजयासाठी 34 चेंडूत 85 धावा हव्या होत्या. डेव्हिड मलान आणि जॉनी बेयरस्टो ही जोडी मैदानात होती. पण पुन्हा एकदा शार्दुलने इंग्लंडचा बाजार उठवला.

शार्दुल 15 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमध्ये शार्दुलने आधी जॉनी बेयरस्टोला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर सेट असलेल्या डेव्हिड मलानला बोल्ड केलं. यामुळे इंग्लंडची 142 बाद 4 अशी स्थिती झाली. आता सामना जिंकण्यासाठी फटकेबाजीशिवाय पर्याय नव्हता. इंग्लंडने फटके लावायला सुरुवात केली. पण तेव्हापर्यंत उशीर झाला होता. शार्दुलने आपली भूमिका चोखपणे बजावली. भारताने हा पाचवा सामना 36 धावांनी जिंकला. शार्दुलने या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 45 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या.

मागील 3 मालिकांमध्ये सर्वाधिक विकेट्स

शार्दुल या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. शार्दुलने 5 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या. यापैकी 6 विकेट्स या चौथ्या आणि पाचव्या सामन्यात मिळवल्या. याआधी न्यूझीलंड विरुद्ध 2020 मध्ये 5 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. यात त्याने 8 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. तसेच श्रीलंके विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता.

संबंधित बातम्या :

6 बोल 23 रन्स, शार्दूलच्या हाती बोल, 2 वाईड, भारताची धडधड आणि रोहित शर्माची एन्ट्री, नेमकं काय घडलं?

India vs England 4th 2Oi | इंग्लंडच्या पराभवामागे ‘हिटमॅन’चा मास्टरप्लान, शार्दुल ठाकूरला कानमंत्र आणि टीम इंडिया विजयी

India vs England 4Th T20i | शार्दुलचा भेदक मारा, सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी, मुंबईकर खेळाडूंची विजयी कामगिरी

(india vs england t20 series 2021 shardul thakur game changing bowling)