मुंबई : देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये अफलातून कामगिरी करणाऱ्या मुंबईकर सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) इंग्लंड विरुद्च्या टी 20 मालिकेसाठी (india vs england t20i series) निवड करण्यात आली. सूर्याने दुसऱ्या टी 20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. सूर्याला पदार्पणात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान पदार्पण केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत सूर्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (india vs england t20i series suryakumar yadav first reaction after debut)
This one is for my mom, dad, sister, my wife, my coach and all my well wishers.
We dreamt together – we waited together – we full filled together ?? pic.twitter.com/we0lAzqPve
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) March 14, 2021
सूर्यकुमारला दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाची कॅप देऊन सन्मानित करण्यात आलं. सूर्याने ट्विटमध्ये आपल्या कुटुंबियांचे आभार मानले. “माझे आई वडील, ताई, बायको, प्रशिक्षक आणि इतर सहकाऱ्यांच्या मेहनतीचं फल आहे. या क्षणासाठी आम्ही सर्वांनी वाट पाहिली. आमचं सर्वाचं एकत्र स्वप्न पूर्ण झालं”, असं सूर्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.
“इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी माझी निवड झाल्याचं मला समजलं. मी फार उत्साहित झालो होतो. मी माझ्या घरी टीव्ही पाहत होतो. तेव्हा माझी निवड झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला. टीम इंडियामध्ये माझं नाव पाहून मी रडू लागलो. मी आमच्या कुटुंबियांना तडक व्हिडीओ कॉल केला. आम्हा कुटुंबियांसाठी हा मोठा क्षण होता. आम्ही सर्व रडू लागलो”, असं सूर्यकुमार म्हणाला. सूर्यकुमार बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. यावेळस त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान सूर्याला पदार्पणातील सामन्यात फलंदाजी संधी मिळाली नाही. भारताने दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. यासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. दरम्यान या मालिकेतील तिसरा सामना 16 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
सूर्यकुमार आयपीएलच्या 13 व्या मोसमात 16 सामने खेळला. या 16 सामन्यात त्याने 4 अर्धशतकांसह 480 धावा केला. आयपीएल 2019 मध्ये सूर्यकुमारने 16 सामन्यांमध्ये 424 धावा फटकावल्या होत्या. 2018 च्या आयपीएलमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 512 धावा फटकावल्या होत्या. आयपीएलच्या 101 सामन्यांमध्ये 86 डावांत फलंदाजी करताना 30.2 च्या सरासरीने सूर्यकुमारने 2024 धावा फटकावल्या आहेत. यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
(india vs england t20i series suryakumar yadav first reaction after debut)