अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना (India vs England 3rd Test) अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये (Motera Stadium) खेळवण्यात येणार आहे. या तिसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. तसेच या सामन्यासाठीच्या तिकीटविक्रीला रविवार 14 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या (Gujrat Cricket Association)अधिकाऱ्यांनी दिली. (india vs england test series 2021 audience allowed to stadium in 3rd day night test match at motera stadium)
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नव्हती. पण संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व नियम काही अंशी शिथिल करण्यात आले. त्यानुसार या तिसऱ्या सामन्यासाठी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार आहे. स्टेडियमची एकूण क्षमता ही 1 लाख 10 हजार इतकी आहे. त्यानुसार 50 टक्के अर्थात 55 हजार चाहत्यांना स्टेडियममध्ये परवानगी मिळणार आहे. चाहत्यांना कोरोना नियमांच पालन कराव लागणार आहे.
हा तिसरा कसोटी सामना डे नाईट असणार आहे. विशेष म्हणजे ही मॅच गुलाबी चेंडूने खेळली जाणार आहे. 24-28 फेब्रुवारी दरम्यान हा सामना खेळण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी खेळाला सुरुवात होणार आहे. तर मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामनाही याच स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
सर्वसामन्यांना परवडतील असे तिकीट दर ठेवण्यात आले आहेत. 300-1000 रुपयांच्या दरम्यान तिकीट दर असणार आहेत. तसेच या सामन्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह 24 फेब्रुवारीला स्टेडियमच्या उद्घाटन समारोहाला उपस्थित राहणार असल्याची माहिती जीसीएच्या अधिकाऱ्याने दिली.
कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघांमध्ये 5 मॅचची टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील सर्व सामन्यांचं आयोजन हे अहमदाबादमध्येच करण्यात आले आहे. कोरोना काळात खेळाडूंना अनावश्यक प्रवासाचा त्रास वाचावा, या उद्देशाने या मालिकेतील सर्व सामने हे एकाच स्टेडियममध्ये खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सीरिजमधील सामने 1 दिवसाच्या अंतराने खेळण्यात येणार आहेत. हे सर्व सामने संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहेत.
12 मार्च | पहिली टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता
14 मार्च | दुसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता
16 मार्च | तिसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता
18 मार्च | चौथी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता
20 मार्च | पाचवी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता
संबंधित बातम्या :
India vs England 2021 | कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक, दोन्ही संघ, Full schedule
India vs England 2nd Test, 3rd Day Live | टीम इंडियाची चौथी विकेट, रिषभ पंत आऊट