चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (England Tour India 2021) यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. कोरोनानंतर टीम इंडिया तब्बल 11 महिन्यानंतर भारतात क्रिकेट खेळणार आहे. इंग्लंड आणि टीम इंडियाने गत कसोटी मालिका जिंकल्या आहेत. यामुळे दोन्ही संघाचा विश्वास वाढलेला आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत दोन्ही संघात रंगतदार सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान या मालिकेत टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटु रवीचंद्रन अश्विनला एक विक्रम करण्याची संधी आहे. (india vs england test series ravichandran ashwin have chance to complete 400 wickets in test cricket)
अश्विनला इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये 400 विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे. अश्विन या विक्रमापासून केवळ 23 विकेट्स दूर आहे. अश्विनने या मालिकेत 400 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला तर, तो श्रीलंकेचा फिरकीपटू मुथैया मुरलीथरननंतर वेगवान 400 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरेल. मुरलीथरनने एकूण 72 कसोटींमध्ये 400 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तर अश्विनच्या नावावर 74 कसोटींमध्ये 377 विकेट्सची नोंद आहे.
टीम इंडियाकडून आतापर्यंत अनिल कुंबळे (619), कपिल देव (434) आणि हरभजन सिंह (417) या 3 गोलंदाजांनीच 400 पेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा किर्तीमान केला आहे. यामुळे अश्विनने 400 विकेट्सचा टप्पा ओलांडल्यास तो चौथा भारतीय ठरेल.
अश्विनने कसोटीमध्ये इंग्लंड विरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. अश्विनने इंग्लंड विरुद्ध15 कसोटीतील 27 डावात 36.51 च्या सरासरीने 56 विकेट्स घेतल्या आहेत. एका डावात 55 धावा देऊन 6 विकेट्स तर एका सामन्यात 167 धावा देत 12 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. ही कामगिरी त्याने 2016-17 मध्ये मुंबई कसोटीमध्ये केली होती.
इंग्लंड टीम 4 वर्षांपूर्वी भारत दौऱ्यावर आली होती. यावेळेस टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंडवर 4-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका विजय मिळवला होता. या मालिकेत अश्विनने निर्णायक भूमिका पार पाडली होती. अश्विनने या मालिकेत एकूण 28 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे यावेळेसही अश्विनकडून अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी
दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी
तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी
चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च
पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.
टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.
संबंधित बातम्या :
#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा
England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?
(india vs england test series ravichandran ashwin have chance to complete 400 wickets in test cricket)