अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england test series) यांच्यात 4 मार्चपासून कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. ही चौथी कसोटी टीम इंडियासाठी मालिका विजय आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने (world test championship) महत्वाची असणार आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पोहचण्यासाठी हा सामना जिंकावा किंवा अनिर्णित करावा लागणार आहे. या दोन्ही पैकी काहीही झाल्यास टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळेल. तसेच यासह टीम इंडियाचा भारतातील 13 वा मालिका विजय ठरेल. (india vs england test series team india have chance to 13 consecutive series win at home)
इंग्लंडने टीम इंडियाला भारतातच 2012 मध्ये कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. त्यानंतर भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नाही. टीम इंडियाने भारतात 2019 मध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हा बांगलादेशचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला होता. हा भारताचा 12 वा मालिका विजय ठरला होता. टीम इंडियानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या देशात खेळताना सलग 2 वेळा 10-10 कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.
भारत- सलग 12 सीरीज, फेब्रुवारी 2013 ते आतापर्यंत
ऑस्ट्रेलिया- सलग 10 मालिका विजय, नोव्हेंबर 1994 ते नोव्हेंबर 2000
ऑस्ट्रेलिया- 10 कसोटी मालिका, जुलै 2004 ते नोव्हेंबर 2008
वेस्टइंडिज- 8 मालिका विजय, मार्च 1976 ते फेब्रुवारी 1996
इंग्लंड- 7 सीरीज, मे 2009 ते मे 2012
साउथ अफ्रीका- 7 सीरीज, मार्च 1998 ते नोव्हेंबर 2001
टीम इंडियाने भारतात इंग्लंड विरुद्धच्या 2012 च्या कसोटी मालिकेनंतर आतापर्यंत एकूण 37 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यापैकी 30 सामन्यांमध्ये विजय झाला आहे. तर 2 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर 5 सामने हे अनिर्णित राहिले होते. ऑस्ट्रेलियाने सलग 10 टेस्ट सारीज जिंकल्या आहेत. यात त्यांनी 27 पैकी 20 सामन्यांमध्ये विजयश्री मिळवली. तर केवळ 2 सामने गमावले.
प्रतिस्पर्धी संघ, विजयी अंतर, वर्ष
ऑस्ट्रेलिया, 4-0 (4), फेब्रुवारी 2013
वेस्टइंडीज, 2-0 (2), नोव्हेंबर 2013
साउथ अफ्रिका, 3-0 (4), नोव्हेंबर 2015
न्यूझीलंड, 3-0 (3), सप्टेंबर 2016
इंग्लंड, 4-0 (5), नोव्हेंबर 2016
बांग्लादेश, 1-0 (1), फेब्रुवारी 2017
ऑस्ट्रेलिया, 2-1 (4), फेब्रुवारी 2017
श्रीलंका, 1-0 (3), नोव्हेंबर 2017
अफगानिस्तान, 1-0 (1), जून 2018
वेस्टइंडीज, 2-0 (2), ऑक्टोबर 2018
साउथ अफ्रिका, 3-0 (3), ऑक्टोबर 2019
बांगलादेश, 2-0 (2), नोव्हेंबर 2019
संबंधित बातम्या :
(india vs england test series team india have chance to 13 consecutive series win at home)