मेलबर्न : विश्वचषक (T20 world cup 2022) सुरु झाल्यापासून केएल राहूलकडून (Kl Rahul) अद्याप चांगली खेळी झालेली नाही. त्यामुळे त्याच्यावर सुध्दा चाहत्यांनी अधिक टीका केली आहे. पाकिस्तानच्याविरुद्ध (Pakistan) तो चांगली खेळी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु त्याने चाहत्यांची निराशा केली. आजच्या मॅचमध्ये सुध्दा त्याने चांगली खेळी केली नाही.
आजच्या मॅचमध्ये नेदरलॅंडविरुद्ध टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 179 धावा काढल्या आहेत. विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव चांगली खेळी केली आहे. अंतिम ओव्हरमध्ये सुर्यकुमार यादव आणि विराटने गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली.
नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीड, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, स्कॉट एडवर्ड्स (डब्ल्यू/सी), टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मेकरेन
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, रोहित शर्मा (क), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग