मुंबई : भारत पाकिस्तान (India vs Pakistan) क्रिकेट मॅच व्हावी, अशी क्रिकेट रसिकांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची इच्छा आहे. त्यांची हीच इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान एप्रिल महिन्यात टी ट्वेन्टी (three Nation T20 Series) सिरीज पार पडणार आहे. वास्तविक ही मालिका तीन देशांदरम्यान खेळवली जाणार आहे. भलेही ही सिरीज तिन्ही देशांच्या अंध खेळाडूंदरम्यान खेळवली जाणार आहे (Blind Cricket). मात्र खेळाचं स्वरुप आणि प्रारुप काहीही असलं तरी शेवटी तो सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानविरुद्ध होत असल्याने क्रिकेट रसिकांची उत्कंठा वाढली आहे. (India vs Pakistan Blind Cricket three Nation T20 Series)
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश अंध संघांदरम्यान ही टी ट्वेन्टी मालिका पार पडणार आहे. येत्या 2 एप्रिलपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. 8 एप्रिल रोजी मालिकेतील अखेरचा सामना खेळविण्यात येणार आहे.
टी ट्वेन्टी मालिकेतील सगळे सामने ढाका येथे खेळविण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तान क्रिकेट काऊन्सिलने म्हटलंय, पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश हे तिन्ही संघ तिरंगी टी ट्वेन्टी मालिकेत सहभागी होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान पहिली लढत 4 एप्रिल रोजी ढाका येथे होईल. मालिकेतील पहिला सामना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार आहे.
पाकिस्तान अंध क्रिकेट काऊन्सिलच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, टी ट्वेन्टी मालिकेत भाग घेणाऱ्या सगळ्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
मालिकेच्या आयोजनानुसार पहिला सामना भारत अंध विरुद्ध बांगलादेश अंध या दोन्ही संघादरम्यान होईल. 3 एप्रिलला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हे संघ आमने सामने येणार आहेत. तर 4 एप्रिलला भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 5 एप्रिलला कोणताही सामना होणार नाही.
6 एप्रिलला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश तर 7 एप्रिलला पुन्हा एकदा भारतीय अंध खेळाडूंची टीम पाकिस्तानच्या अंध खेळाडूंच्या संघाशी भिडणार आहे.
(India vs Pakistan Blind Cricket three Nation T20 Series)
सचिनसाठी शोएब अख्तरने अल्लाहकडे मागितली दुवा, म्हणाला…https://t.co/prRpLnSndZ#SachinTendulkar #ShoiabAkhtar #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2021
हे ही वाचा :
सचिनसाठी शोएब अख्तरने अल्लाहकडे मागितली दुवा, म्हणाला…
IPL 2021 : यंदाच्या पर्पल कॅपचा मानकरी कोण? हे 4 बोलर्स प्रबळ दावेदार…