मेलबर्न : टीम इंडियाने (Team India) झालेल्या दोन मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला आहे. टीम इंडियाचे तीन फलंदाज सद्या अधिक चर्चेत आहेत. त्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli), सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandhya) तीन फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची तिसरी मॅच होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका गोलंदाजांने टीम इंडियाला चॅलेंज दिलं आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध चांगली खेळी केली, त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा चार गडी राखून विजय झाला. दुसऱ्या मॅचमध्ये नेदरलॅंडस् टीम विरुद्ध चांगली फलंदाजी केली. त्यामुळे 56 धावांनी विजय मिळविला. पण उद्या आफ्रिकेच्या तेज गोलंदाजांविरुद्ध कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
टीम इंडियाविरुद्ध उद्याच्या पर्थच्या मैदानात आफ्रिका आणखी एका जलदगती गोलंदाजाला खेळवण्याची शक्यता आहे. कारण पार्थच्या मैदानावर जलदगती गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असं लांस क्लूजनर याने स्पष्ट केसं आहे. त्याचबरोबर लांस क्लूजनर याने आफ्रिकेच्या गोलंदाजांविरुद्ध अधिक धावा करणं शक्य होणार नाही असंही म्हटलं आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
दक्षिण आफ्रिका टीम
टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्सिया, मार्को जॅन्सेन, कागिसो रबाडा, रिले रोसो, तबरेझ शम्सी आणि ट्रिस्टन स्टब्स.