मागच्या रविवारी ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक सुरु झाल्यापासून टीम इंडियाकडे (Team India) अनेक माजी खेळाडूंचं लक्ष आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या फलंदाजांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुरेश रैना (Suresh Raina) सचिन तेंडलकर या टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी टीम इंडियाकडे विश्वचषक जिंकण्यासाठी ताकद असल्याचं म्हटलं आहे.
नुकतीच टीम इंडियाचा माजी खेळाडू कपिल देवने सुद्धा भविष्यवाणी केली आहे. त्याने आमच्या काळात सगळेचं प्लेअर ऑलराऊडर असायचे असं म्हटलं आहे. तसेच टीम इंडियामध्ये हार्दीक पांड्या हा फक्त ऑलराऊंडर खेळाडू आहे.
विश्वचषक स्पर्धेत दाखल झालेल्या इतर टीम सुद्धा चांगल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया 30 टक्के सेमी फायनलमध्ये पोहोचेल अशी भविष्यवाणी कपिल देवने केली आहे.
भारत आणि पाकिस्तानची मॅच येत्या रविवारी होणार आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जगभरातील क्रिकेटचे त्या मॅचची वाट पाहत आहेत.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान टीम
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.