IPL : भारतीय अष्टपैलू क्रिकेट खेळाडू मुस्लिम मुलीच्या प्रेमात ‘क्लीन बोल्ड’

| Updated on: Sep 29, 2022 | 4:34 PM

गेल्यावर्षी दोघांनी जुलै महिन्यात लग्न केलं, परंतु त्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

IPL : भारतीय अष्टपैलू क्रिकेट खेळाडू मुस्लिम मुलीच्या प्रेमात क्लीन बोल्ड
shivam dube
Image Credit source: twitter
Follow us on

भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या (Indian Cricket Player) आत्तापर्यंत आपण प्रेम कहाणी ऐकल्या आहेत. तसेच काही खेळाडूंनी लग्न झाल्यानंतर आपल्या प्रेमाची व्यथा जाहीरपणे मांडली आहे. आयपीएलमध्ये (IPL) चांगली कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू मुस्लिम मुलीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला होता. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या अनेक प्रेम कहाणी आपण पाहिल्या आहेत, किंवा उघडकीस आल्या आहेत. ऋषभ पंतची सुद्धा फिल्मी स्टोरी मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.

शुवम दुबे हा खेळाडू एका मुस्लिम मुलींच्या प्रेमात वेडा झाला होता. नुकतेचं त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यांच्या गर्लफ्रेंडचं नाव अंजुम खान असं आहे. त्याने मुंबईत लग्न केलं आहे. अनेकवर्षे डेट केल्यानंतर त्याने लग्नाचा विचार केला.

हे सुद्धा वाचा

गेल्यावर्षी दोघांनी जुलै महिन्यात लग्न केलं, परंतु त्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

ज्यावेळी फोटो व्हायरल झाले होते, त्यावेळी शुवम दुबे याने आम्ही प्रेमाच्या प्रेमात पडलो जे प्रेमापेक्षा जास्त होते. तसेच त्याने लिहिले की आता आपले आयुष्य कायमचे सुरू झाले आहे.

विशेष म्हणजे दोघांनी आपलं लग्न हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने केलं आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या घरी पाहुण्याचं आगमन झालं.

क्रिकेटर शिवम दुबेची पत्नी अंजुम खान मूळची उत्तर प्रदेशची आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून फाइन आर्टमध्ये पदवी घेतली आहे.