मुंबई : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी विश्वचषकावर भविष्यवाणी केली आहे. विष्वचषक 2019 चा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या दोन संघात खेळवला जाईल, असं पिचाई यांनी युएसआयबीसीच्या इंडिया आयडियाज समीट कार्यक्रमात म्हटलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंतच्या सामन्यात चांगले प्रदर्शन केले आहे, असं म्हणत त्यांनी संघाचे कौतुकही केले.
युएसआयबीसीचे अध्यक्ष निशा देसाई बिस्वाल यांनी सुंदर पिचाई यांना प्रश्न विचारला ‘तुम्हाला काय वाटतं विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कोण पोहचेल?’ या प्रश्नावर उत्तर देताना पिचाई यांनी भविष्यवाणी वर्तवली.
“जेव्हा मी अमेरिकेत आलो तेव्हा मला बेसबॉल खेळ खूप आव्हानात्मक वाटत होता. मी पहिल्यांदा आलो तेव्हा येथे बेसबॉल खेळण्याचा प्रयत्न केला. मला वाटते हा खेळ थोडा आव्हानात्मक आहे. मला माझ्या पहिल्या सामन्यात आनंद वाटत होता की, मी बॉल मागे हटवला. जर हेच क्रिकेटमध्ये केले असते तर लोकांनी कौतुक केले असते, पण लोकांनी याचे कौतुक केले नाही”, असं सुंदर पिचाई यांनी क्रिकेट आणि बेसबॉल विषयी बोलतांना आपले काही अनुभव सांगितले.
क्रिकेटमध्ये तुम्ही धावांसाठी पळता तेव्हा बॅट तुमच्यासोबत असते, तर मी सुद्धा बेसबॉलमध्ये माझ्या बॅटसोबत पळालो. ते यासाठीच की मला हा खेळ समजेल की, बेसबॉल थोडा आव्हानात्मक खेळ आह. पण क्रिकेटवर माझे खूप प्रेम आहे, अस पिचाई म्हणाले.
ते म्हणाले, विश्वचषक क्रिकेट सुरु आहे. अपेक्षा करतो भारत यामध्ये चांगले प्रदर्शन करेल. पण या खेळात अनेक गोष्टीं पणाला लागल्या आहेत.