मुंबई : ऑस्ट्रेलियात (India vs Australia) केलेल्या शानदार प्रदर्शनामुळे चर्चेत आलेल्या भारतीय संघाचा नवा यॉर्करकिंग गोलंदाज टी नटराजनला (T Natarajan) महिंद्रा ऑटोमोबाईल्सचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी थार एसयूव्ही (Thar SUV) ही भारदस्त गाडी भेट दिली होती. नटराजनने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्याला महिंद्रा यांच्याकडून मोठं गिफ्ट मिळाल्यानंतर त्यानेही आनंद महिंद्रा यांना खास गिफ्ट पाठवलं आहे. (Indian bowler T Natarajan return Gift To Aanand Mahindra)
भारतीय संघाने गाबाच्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला. या विजयात टी नटराजनने महत्त्वाची भूमिका बजावली. याच कसोटीत परिधान केलेली जर्सी सही करुन ती जर्सी त्याने महिंद्रा यांना दिली आहे. टी नटराजन याचं हे खास गिफ्ट आनंद महिंद्रा यांना देखील आवडल्याशिवाय राहणार नाही. कारण गाबाची कसोटी खूपच ऐतिहासिक ठरली. इथून पुढची कित्येक वर्ष हा विजय भारताच्या आठवणीत राहणार आहे. याच सामन्यात परिधान केलेली जर्सी नटराजनने महिंद्रा यांना गिफ्ट केल्याने हे गिफ्ट महिंद्रा यांना आवडल्यावाचून राहणार नाही.
Playing cricket for India is the biggest privilege of my life. My #Rise has been on an unusual path. Along the way, the love and affection, I have received has overwhelmed me. The support and encouragement from wonderful people, helps me find ways to #ExploreTheImpossible ..1/2 pic.twitter.com/FvuPKljjtu
— Natarajan (@Natarajan_91) April 1, 2021
ऑस्ट्रेलियाविरुद्धची ब्रिस्बेन कसोटी जिंकण्यात टी नटराजनचा महत्त्वाचा वाटा होता. त्याच्या याच मॅचचा बोलिंग परफॉर्मन्स महिंद्रा यांना आवडला होता. हाच परफॉरमन्स पाहून महिंद्रा यांनी त्याला गाडी भेट देण्याची घोषणा केली होती. अखेर आयपीएलआधी महिंद्रा यांनी त्याला गाडी भेट दिली आहे. गाडीसोबतचे फोटो ट्विट करुन नटराजनने महिंद्रा यांना धन्यवाद दिले आहेत.
भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा क्षण आहे. माझा प्रवास खूपच कठीण रस्त्याने झालाय. परंतु याच रस्त्यावर मला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळालं. त्याच बळावर मी चांगलं प्रदर्शन करु शकलो. आज मी महिंद्रा यांचं गिफ्ट स्वीकारतोय त्या वेळी मला भरुन आलंय. त्यांच्याविषयी मला आदर आहे. त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी माझा प्रवास ओळखला आणि माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आपलं क्रिकेटविषयीचं प्रेम पाहता मी आपल्याला गाबा टेस्टमध्ये परिधान केलेली जर्सी भेट पाठवत आहे”
(Indian bowler T Natarajan return Gift To Aanand Mahindra)
हे ही वाचा :
Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2011 Cricket World Cup : कॅन्सरशी लढला, मैदानात रक्त सांडलं, मात्र मागे हटला नाही, वर्ल्डकप जिंकलाच!
वादग्रस्त अंपायर्स कॉल निर्णयावर आयसीसीचा मोठा निर्णय, DRS नियमांमध्ये 3 मोठे आणि महत्त्वाचे बदल!