WPL: वुमन्स प्रिमियर लीग लिलावाबाबत प्रश्न विचारताच हरमनप्रीत कौरनं स्पष्टचं सांगितलं, “आता काहीही होवू दे…”

| Updated on: Feb 05, 2023 | 6:34 PM

Women T20 WC 2023: वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी इंग्लंड, आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभूत करावं लागणार आहे.

WPL: वुमन्स प्रिमियर लीग लिलावाबाबत प्रश्न विचारताच हरमनप्रीत कौरनं स्पष्टचं सांगितलं, आता काहीही होवू दे...
टी 20 वर्ल्डकपसाठी सज्ज असताना कर्णधार हरमनप्रीत कौरनं सांगितलं की, "Auction पेक्षा महत्त्वाचं..."
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून सुरु होत असून भारतीय संघ सज्ज आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. यंदाच्या विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ मेहनत घेत आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. 12 फेब्रुवारी 2023 रोजी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. असं असताना वुमन्स प्रिमियर लीगसाठी लवकरच लिलाव होणार आहे. 13 फेब्रुवारी 2023 रोजी वुमन्स प्रिमियम लीगसाठी लिलाव होणार आहे. याबाबत कर्णधार हरमनप्रीत कौर हीला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारताच तिने स्पष्ट सांगितलं की, आमचं संपूर्ण लक्ष हे वर्ल्डकप स्पर्धेवर आहे. संघाला वर्ल्डकपचं महत्त्व माहिती आहे. त्यामुळे सध्यातरी आम्ही यासाठी कठोर मेहनत घेत आहोत.

“लिलावापूर्वी आमचा महत्त्वाचा सामना होणार आहे. आमचं संपूर्ण लक्ष यावर केंद्रीत आहे. वर्ल्डकप सर्वात महत्त्वाची स्पर्धा आहे आणि आमचं संपूर्ण लक्ष आयसीसी ट्रॉफीकडे लागून आहे. प्रत्येक खेळाडूला याबाबतचं महत्त्व माहिती आहे”, असं हरमनप्रीत कौर हीनं पत्रकार परिषदेत सांगितलं. “वुमन्स प्रिमियर लीग तरुण खेळाडूंना संधी देईल. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेटला सुगीचे दिवस येतील हे ही तितकं खरं आहे.”, असंही तिने पुढे सांगितलं.

“वर्ल्डकप आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या स्पर्धेची काही वर्षे वाट पाहावी लागले. पुढचे दोन ते तीन महिने महिला क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहेत. WBBL आणि Hundred या क्रिकेट स्पर्धांनी क्रिकेटला प्रोत्साहन दिलं आहे. त्याच पद्धतीने आपल्या देशात वुमन्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून घडेल, अशी आशा आहे.”, असंही तिने पुढे सांगितलं.

वर्ल्डकप स्पर्धेतील भारतीय संघाचे सर्व सामने आणि तारखा

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (12 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)
  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (15 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)
  • भारत विरुद्ध इंग्लंड (18 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)
  • भारत विरुद्ध आयर्लंड (20 फेब्रुवारी 2023, वेळ- संध्याकाळी 6.30 वाजता)

भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे

पाकिस्तानी संघ- अयेशा नसीम, जवेरिया खान, सदाफ शाम्स, सिद्रा अमीन, अलिया रियाझ, बिस्माह मरुफ (कर्णधार), फातिमा साना, निदा दार, ओमैमा सोहेल, मुनीबा अली, सिद्रा नवाज, एमन अनवर, डायना बैग, घुलाम फातिमा, कैनत इम्तियाझ, नाश्रा संधू, सादिया इकबाल, तुबा हस्सन