India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटला सचिनचे हे 2 विक्रम मोडित काढण्याची संधी

| Updated on: Nov 19, 2020 | 3:28 PM

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटला सचिनचे हे  2  विक्रम मोडित काढण्याची संधी
virat and sachin
Follow us on

सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (India vs Australia 2020) सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून (Odi Series) होत आहे. या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करत आहेत. 27 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली वनडे खेळण्यात येणार आहे. एकूण 3 एकदिवसीय सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli)विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. विराटला टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) 2 विक्रम मोडित काढण्याची संधी आहे. Indian captain Virat Kohli has the opportunity to break Sachin Tendulkar record for most runs and centuries against and in Australia

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा

टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्या नावे आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 25 वनडे सामन्यात 30.83 च्या सरासरीने 740 धावा केल्या आहेत. सचिनचा हा विक्रम मोडित काढण्यासाठी विराटला केवळ 112 धावांची आवश्यकता आहे. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये 15 एकदिवसीय सामन्यात 44.92 च्या सरासरीने 629 धावा केल्या आहेत. 3 वनडे सामन्यात विराटला सचिनचा विक्रम मोडित काढण्याची संधी आहे.

सर्वाधिक शतकं

विराटकडे सर्वाधिक शतकांच्या बाबतीत सचिनची बरोबरी करण्याची संधी आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात एकूण 9 शतकं लगावली आहेत. तर दुसऱ्याबाजूला विराटच्या नावावर 8 शतकांची नोंद आहे. त्यामुळे विराटला सचिनच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी  1 तर विक्रम मोडित काढण्यासाठी 2 शतकी खेळींची आवश्यकता आहे.

‘विराट’ सरासरी

सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 71 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 44.59 च्या सरासरीने 3 हजाार 77 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतकांचा समावेश आहे. तर विराटने 40 सामने खेळेले आहे. विराटने या 40 सामन्यांमध्ये 8 शतकांसह 54.57 च्या दमदार सरासरीने 1940 धावा केल्या आहेत. म्हणजेच सरासरीच्या बाबतीत विराट सचिनच्या पुढे आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ

एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टॉर्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा

टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

संबंधित बातम्या :

INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

Indian captain Virat Kohli has the opportunity to break Sachin Tendulkar record for most runs and centuries against and in Australia