सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीत (India Tour Australia) दाखल झाली आहे. टीम इंडिया या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. विराट क्रिकेट विश्वातील पावरफुल खेळाडू आहे, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने कोहलीचे कौतुक केलं आहे. indian captain Virat kohli is one of the most powerful players in the world of cricket says former Australia captain mark taylor
“माझ्या दृष्टीने विराट जागतिक क्रिकेटमधील सर्वात शक्तिशाली क्रिकेट खेळाडू आहे. विराटने नेहमीच आक्रमकपणे खेळतो. तो योग्य दिशेने जात आहे. तो आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतोय. त्याला क्रिकेटबद्दल आदर आहे. त्यांना खेळताना पाहून आम्हाला नेहमीच आनंद होतो”, असं विधान टेलरने सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.
टीम इंडिया एकदिवसीय, टी 20 मालिकेनंतर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र विराट पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे. जानेवारी महिन्यात विराट बाबा होणार आहे. विराटच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. आयुष्यातील असे महत्वाचे क्षण आपल्या कुटुंबासोबत घालवू इच्छितो. त्यामुळे विराट पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे. बीसीसीआयने विराटला पालक्तवाची रजा मंजूर केली आहे.
विराटने 2011-12 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलं शतक लगावलं होतं. दरम्यान त्या मालिकेत भारताचा ऑस्ट्रेलियाने 0-4 च्या फरकाने पराभव केला होता. यानंतर विराटने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 शतकांसह 692 धावा केल्या. विराटने या 4 पैकी 2 शतकं ही एकाच सामन्यात लगावली होती. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या दौऱ्यात विराटने 282 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 च्या फरकाने पराभव केला होता.
मालिकानिहाय वेळापत्रक
एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल
टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी
कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
संबंधित बातम्या :
India Tour Australia | विराट कोहलीमुळे अॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली
IND vs AUS : विराट कोहलीचा द्वेष करतो आणि प्रेमही, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचं गमतीशीर विधान
indian captain Virat kohli is one of the most powerful players in the world of cricket says former Australia captain mark taylor