मुंबई : कोरोना विषाणूमुळे 2020 या वर्षात अनेक क्रिकेट स्पर्धा स्थगित कराव्या लागल्या. तसेच अनेक दौरेही रद्द करावे लागले. कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं. मात्र पुढील वर्षात म्हणजेच 2021 मध्ये टीम इंडियाचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. टीम इंडियाचा India Future Tour Program 2021 जाहीर करण्यात आला आहे. यानुसार टीम इंडिया आगामी वर्षात एकूण 14 कसोटी, 16 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळणार आहे. तसेच 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा ही खेळण्यात येणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे खेळण्यात येणाऱ्या आयपीएल स्पर्धेचाही समावेश असणार आहे. indian cricket team future tour program full schedule 2021
सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट 19 जानेवारीला होणार आहे. यानंतर टीम इंडिया भारतात परतणार आहे. यानंतर टीम इंडिया इंग्लडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंड 2021 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडियाविरुद्ध प्रत्येकी 4 कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळणार आहे. इंग्लंडचा हा एकूण 3 महिन्यांचा लांबलचक दौरा आहे.
आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन कोरोनामुळे यूएईमध्ये करण्यात आलं. ” पुढील वर्षात फेब्रुवारीपर्यंत कोरोनावर लस येईल, असं झाल्यास नक्कीच भारतात नेहमीप्रमाणे आयपीएलच्या 14 व्या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल”, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केला. “तसे न झाल्यास यूएईचा पर्याय आहेच”, असंही गांगुली म्हणाला. त्यामुळे मार्च ते मे दरम्यान आयपीएल स्पर्धा खेळण्यात येणार हे निश्चित आहे. या स्पर्धेदरम्यान सर्वच संघातील खेळाडू व्यग्र असतात.
आयपीएल स्पर्धेनंतर खेळाडू विश्रांती करतील. या काही दिवसांच्या विश्रांनतीनंतर टीम इंडिया जून महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 3 एकदिवसीय आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
आशिया कप
श्रीलंका दौरा संपल्यानंतर लगोलग आशिया कप खेळण्यात येणार आहे. या आशिया कपचंही आयोजन श्रीलंकेत करण्यात आलं आहे.
झिमबाब्वे दौरा
आशिया कपनंतर टीम इंडियाला झिमबाब्वे दौऱ्यावर जावं लागणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियातील मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
इंग्लंड दौरा
जुलै-सप्टेंबर दरम्यान टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर
इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यानंतर टीम इंडिया भारतात परतणार आहे. यानंतर ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यावर टीम इंडियाविरुद्ध 3 एकदिवसीय आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
ICC T 20 World Cup
या 2021 वर्षातील टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचं मान भारताला मिळाला आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळण्यात येणार आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड टीम इंडियाविरुद्ध 2 कसोटी आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
टीम इंडियाच्या 2021 या वर्षाचा शेवट दक्षिण आफ्रिका दौऱ्याने होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 कसोटी आणि तितक्याच टी 20 मॅच खेळणार आहेत.
संबंधित बातम्या :
India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी टीम इंडियाची घोषणा
INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
indian cricket team future tour program full schedule 2021