आजकाल असा एकही व्यक्ती नाही जो मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा वापर करत नाही. अनेकदा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. काही दिवसांपासून अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी भरताचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्यांच्या पत्नीचे घटस्फोट झाला होता ज्यामुळे त्यांची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा सुरू होती. त्यानंतर भारत न्यूझिलेंड चॅंपियन्स ट्रॉफीच्या फायनल्समध्ये चहल सोबत आर. जे माविश फायनल्सचा आनंद लुटताना दिसली. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आणि आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी, सर्वांचा लाडका हिटमॅन रोहित शर्मा त्याच्या कुटुंबातील लोकांसह सुट्ट्यांसाठी मालदीवला गेला होता. सुट्टी एन्जॉय केल्यानंर 17 मार्च रोजी भारतामध्ये परत आला. परंतु मंबई विमानतळावर त्याच्या कढून असे काही कृत्य घडले ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरू झाली. आपण सर्वे रोहित शर्माचा स्टेडियममधील राग अनेक वेळा पाहायला आहे. परंतु भारतामध्ये परत आल्यावर रोहित शर्मा पापाराझींवर भडकला.
मालदिव्हवरून कुटुंबियांसह भारतात परताना रोहित शर्मा विमान तळावरील पापराझिंवर भडकला. त्याचे मुख्य कारण म्हणजे, काही पापाराझी रोहित शर्माच्या मुलीचे म्हणजेच समायराचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्व पापाराझींवर हिटमॅनचा भडका उडाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित समायरासोबत त्याच्या गाडीकडे चालत जाताना दिसत आहे. त्यावेळा तिथे उपस्थित असलेले पापाराझी त्यांचे फोटो काढू लागले तेव्हा रोहितने समायराला कॅमेऱ्यांपासून वाचवण्यासाठी तिला स्वत:च्या मागे लपवले. रोहितने प्रथम समायराला गाडीत बसवले आणि नंतर त्याच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्यांना गाडीत बसण्यास मदत केली. त्या दरम्यान रोहितचे पापाराझींवर पूर्णपणे लक्ष होते. त्यानेतर सर्व सदस्य गाडीमध्ये बसल्यानंतर रोहित सर्व पापाराझींकडे बघून हसला आणि कॅमेऱ्यांसमोर पोज देत होता.
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा लवकरच त्याच्या आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार आहे. 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. कोलकात्यामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटन सामना खेळला जाईल तर मुंबई आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळेल. ‘चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु कर्णधाराने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की तो सध्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नाही, परंतु उन्हाळ्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय त्याला कसोटी कर्णधार म्हणून पाहायला मिळेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.