ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि टी-20 साठी भारतीय संघ जाहीर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या टी-20 संघात महेंद्रसिंह धोनीचं कमबॅक झालं आहे, तर वन डे संघात हार्दिक पंड्याचं पुनरागमन झालंय. यजुवेंद्र चहलचाही भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. टी-20 संघातून श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांना वगळण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी केदार जाधव फिट नव्हता, […]

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि टी-20 साठी भारतीय संघ जाहीर
Follow us on

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या टी-20 संघात महेंद्रसिंह धोनीचं कमबॅक झालं आहे, तर वन डे संघात हार्दिक पंड्याचं पुनरागमन झालंय. यजुवेंद्र चहलचाही भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. टी-20 संघातून श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांना वगळण्यात आलंय.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी केदार जाधव फिट नव्हता, पण न्यूझीलंड दौऱ्यातील टी-20 मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. शिवाय ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या वन डे मालिकेतही केदार जाधवचा समावेश आहे. वन डे संघात खलील अहमदचाही समावेश करण्यात आलाय.

21 नोव्हेंबरपासून भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 21 ते 25 नोव्हेंबर या काळात खेळवण्यात आली. तर 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली. 26 डिसेंबर आणि 3 जानेवारीपासून अनुक्रमे तिसरी आणि चौथी कसोटी खेळवण्यात येणार आहे. ही मालिका संपल्यानंतर लगेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात येईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा जवळपास दोन महिन्यांचा मोठा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ तिथूनच न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येईल. 23 जानेवारीपासून वन डे मालिका, तर त्यानंतर 6 फेब्रुवारीपासून टी-20 मालिका खेळवण्यात येईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी

न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वन डे मालिका

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी

भारत विरुद्ध न्यूझीलंड वेळापत्रक

वन डे मालिका

23 जानेवारी – पहिला वन डे सामना

26 जानेवारी – दुसरा वन डे सामना

28 जानेवारी – तिसरा वन डे सामना

31 जेनवारी –  चौथा वन डे सामना

3 फेब्रुवारी – पाचवा वन डे सामना

टी-20 मालिका

6 फेब्रुवारी – पहिला टी ट्वेण्टी सामना

8 फेब्रुवारी – दुसरा टी ट्वेण्टी सामना

10 फेब्रुवारी – तिसरा टी ट्वेण्टी सामना