ICC World Cup 2019 LIVE : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

ICC World Cup 2019 मुंबई : आयसीसीच्या वन डे विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा (Indian squad for Cricket World Cup 2019) करण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत 15 जणांच्या टीम इंडियावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू आणि युवा विकेटकीपर […]

ICC World Cup 2019 LIVE : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर
Follow us on

ICC World Cup 2019 मुंबई : आयसीसीच्या वन डे विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा (Indian squad for Cricket World Cup 2019) करण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत 15 जणांच्या टीम इंडियावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू आणि युवा विकेटकीपर ऋषभ पंतचा भारतीय संघात समावेश झालेला नाही. दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांनी टीम इंडियात स्थान मिळवण्यात यश मिळवलं आहे.

भारतीय संघ 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल,  कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या,  रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी,

एकदिवसीय विश्वचषकाला (ICC Cricket World Cup 2019)  30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे.

भारतीय संघनिवडीची शेवटची तारीख 23 एप्रिल होती, मात्र आज आठ दिवस आधीच म्हणजे 15 एप्रिलला भारताचा 15 सदस्यीय वर्ल्ड कप संघ जाहीर होत आहे.

दरम्यान, यंदापासून वर्ल्डकपमध्ये एक टीम सर्व संघांसोबत सामने खेळणार आहे. या फेरीनंतर पहिले चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. अंतिम सामना 14 जुलैला खेळवण्यात येईल.

1983 आणि 2011 चा विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियात कोणत्या 15 खेळाडूंना स्थान मिळणार याबाबत उत्सुकता आहे. भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंची नावं निश्चित झाली आहेत, मात्र चौथ्या क्रमांकावर कोण याबाबत संघव्यवस्थापनाला डोकेदुखी आहे.

चौथ्या क्रमांकावर कोण?
दरम्यान, चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघात कुणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता होती. चौथ्या नंबरसाठी अनुभवी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू, के एल राहुल आणि विकेटकीपर ऋषभ पंत यांच्यात चुरस होती. त्यामुळे संघ व्यवस्थापन कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर रायुडू आणि ऋषभ पंतचा पत्ता कट झाला.

46 दिवसात 48 सामने

दरम्यान, यंदा विश्वचषकाच्या 46 दिवसांत तब्बल 48 सामने होणार आहेत. गतविजेता ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 1 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध आहे.

दिनांकसामनाठिकाण
30 मेइंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका द ओव्हल
31 मे पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम
1 जून न्यूझीलंड वि. श्रीलंका सोफिया गार्डन्स, कार्डिफ
1 जून ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान ब्रिस्टल
2 जून बांगलादेश वि. दक्षिण आफ्रिका द ओव्हल
3 जून इंग्लंड वि. पाकिस्तान ट्रेंटब्रिज
4 जून अफगाणिस्तान वि. श्रीलंका सोफिया गार्डन्स, कार्डिफ
5 जून भारत वि. दक्षिण आफ्रिका रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन
5 जून बांगलादेश वि. न्यूझीलंड द ओव्हल
6 जून ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम
7 जून पाकिस्तान वि. श्रीलंका ब्रिस्टल
8 जून अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड टाँटन
9 जून भारत वि. ऑस्ट्रेलिया द ओव्हल
10 जून दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन
11 जून बांगलादेश वि. श्रीलंका ब्रिस्टल
12 जून ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान टाँटन
13 जून भारत वि. न्यूझीलंड ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम
14 जून इंग्लंड वि. वेस्ट इंडिज रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन
15 जून ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका द ओव्हल
16 जून भारत वि. पाकिस्तान ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
17 जून बांगलादेश वि. वेस्ट इंडिज टाँटन
18 जून इंग्लंड वि. अफगाणिस्तान ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
19 जून न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
20 जून ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम
21 जून इंग्लंड वि. श्रीलंका हेडिंग्ले, लीड्स
22 जून भारत वि. अफगाणिस्तान रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन
23 जून पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका लॉर्ड्स
24 जून अफगाणिस्तान वि. बांगलादेश रोझ बाऊल, साऊदॅम्प्टन
25 जून इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स
26 जून न्यूझीलंड वि. पाकिस्तान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
27 जून भारत वि. वेस्ट इंडिज ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
28 जून दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका चेस्टर- ली-स्ट्रीट
29 जून पाकिस्तान वि. अफगाणिस्तान हेडिंग्ले, लीड्स
29 जून ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड लॉर्ड्स
30 जून भारत वि. इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
1 जुलै श्रीलंका वि. वेस्ट इंडिज चेस्टर-ली-स्ट्रीट
2 जुलै भारत वि. बांगलादेश एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
3 जुलै इंग्लंड वि. न्यूझीलंड चेस्टर-ली-स्ट्रीट
4 जुलै अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज हेडिंग्ले, लीड्स
5 जुलै बांगलादेश वि. पाकिस्तान लॉर्ड्स
6 जुलै भारत वि. श्रीलंका हेडिंग्ले, लीड्स
6 जुलै ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

संबंधित बातम्या

ICC World Cup 2019 : वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची 15 एप्रिलला घोषणा  

IPL 2019: ड्वेन ब्रावोच्या हातात बॅट-बॉल सोडून वस्‍तरा-कात्री  

‘या’ ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूचा IPL प्रकरणी विमा कंपनीविरोधात 15.3 लाख डॉलरचा खटला