मुंबई : टीम इंडिया (Team India) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात सध्या T20 मालिका सुरु आहे. पहिली मॅच मुसळधार पाऊस पडल्यामुळे रद्द झाली. दुसरी मॅच टीम इंडियाने चांगली कामगिरी केल्यामुळे जिंकली, तिसरी मॅच नेपियरला होणार आहे. तिथं टीम इंडिया दाखल झाली आहे. टीम इंडियामधील काही खेळाडू चप्पल घालून रस्त्यावर फिरत असल्याचे फोटो व्हायरल (Photo Virak) झाले आहेत. चाहत्यांनी कमेंट करुन अनेक प्रश्न विचारले आहेत.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने कालच्या सामन्यात जलद शतक ठोकलं आहे. त्यांच्या कामगिरीची सगळीकडे चर्चा सुरु आहे. मागच्या काही दिवसांपासून तो प्रत्येक मॅचमध्ये चांगली खेळी करीत आहे.
भुवनेश्वर कुमार आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी चप्पल घातली आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि सरफराज आहे. कुलदीप यादवने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. खेळाडूंचा फोटो सगळीकडे व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर कमेंट केली आहे.
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश, मोहम्मद सिराज. अर्शदीप सिंग, उमरान मलिक
टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.