मुंबई : भारतीय महिला संघाची युवा आक्रमक बॅट्समन शेफाली वर्माने (shafali verma) पुन्हा एकदा आपल्या बॅटची जादू जगाला दाखवलीय. 17 वर्षीय शेफालीने जे भल्याभल्यांना जमलं नाही ते आपल्या बॅटिंगने तिने करुन दाखवलंय. शेफालीने वर्माने आयसीसी जागतिक महिला टी 20 फलंदाजांच्या क्रमवारीत क्रमांक एकचं स्थान पटकावलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी 20 मध्ये 30 बॉलमध्ये तिने 60 धावांची दणदणीत खेळी केली. कर्णधार स्मृती मंधानाने देखील तिला मस्त साथ दिली. दोघी बॅट्समनच्या जीवावार भारताने हा सामना 9 विकेट्सने जिंकला. अगदी 11 व्या षटकातच भारताने आफ्रिकेवर विजय मिळवला. (Indian Women Cricketer shafali verma no 1 Ranking T20)
शेफालीने वर्माने आयसीसी जागतिक महिला टी 20 फलंदाजांच्या क्रमवारीत क्रमांक एकचं स्थान पटकावलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत तिच्या धडाकेबाज बॅटींगने तिने टी 20 त अव्वल स्थान पटकावलंय.
Look who’s back on ?
India opener @TheShafaliVerma regains the No.1 spot in the @MRFWorldwide ICC Women’s T20I Rankings.
Full list: https://t.co/py2wQA3VZq
— ICC (@ICC) March 23, 2021
शेफाली वर्माने आफ्रिकेविरुद्धच्या दोन टी ट्वेन्टी सामन्यांत 23 आणि 47 धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यांत 30 चेंडूत 60 धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाज मूनीच्या खात्यात 748, न्यूझीलंडच्या डेव्हीनच्या खात्यात 716 गुण आहेत. भारताची स्मृती मानधाना 677 गुणांसह सातव्या आणि जेमीमा रॉड्रीग्ज 640 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.
दुसऱ्या टी ट्वेन्टीत आक्रमक खेळी करणाऱ्या शेफालीचं अर्धशतक हुकलं होतं. मात्र या मॅचमध्ये तिने दणदणीत अर्धशतक ठोकलं. 30 चेंडूत तिने 60 धावांची आतिषी खेळी खेळली. यातले 58 रन्स तर तिने केवळ 12 चेंडूत केले. शेफालीने आपल्या खेळीला 7 चौकार आणि 5 षटकारांचा साज चढवला. शेफालीने या सिरीजमध्ये सर्वाधिक रन्स केले. त्यामुळे तिला प्लेअर ऑफ सिरीजचा पुरस्काराचा मान देण्यात आला.
मी सुरुवातीपासूनच आक्रमक पद्धतीने खेळते. जेव्हापासून मी बॅट पकडली आहे तेव्हापासून मी मारुन खेळते. आक्रमक फलंदाजी करताना मला मजा येते. तसंच मला आत्मविश्वासही येतो. जोपर्यंत माझे शॉट्स बसत नाहीत तोपर्यंत मला आत्मविशअलास येत नाही, असं शेफाली म्हणाली.
(Indian Women Cricketer shafali verma no 1 Ranking T20)
हे ही वाचा :
17 वर्षीय शेफाली वर्माचा धमाका, केवळ 12 चेंडूत 58 धावा, चौकार षटकारांची बरसात!