17 वर्षीय शेफाली वर्माचा धमाका, केवळ 12 चेंडूत 58 धावा, चौकार षटकारांची बरसात!

| Updated on: Mar 24, 2021 | 7:13 AM

शेफाली वर्मा... या नावाची दहशत आता जागतिक महिला क्रिकेटमध्ये पसरलीय. कारण तिने कारनामाही तसाच केलाय. अवघ्या 12 चेंडूत तिने 58 धावा ठोकल्या. |

17 वर्षीय शेफाली वर्माचा धमाका, केवळ 12 चेंडूत 58 धावा, चौकार षटकारांची बरसात!
Shafali verma
Follow us on

मुंबई : एकीकडे विराट कोहलीच्या (Virat kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्याच एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंड (India Vs England) संघाचा 66 धावांनी पराभूत केला तर दुसरीकडे भारतीय महिला संघाने (indian Women team) देखील दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 9 विकेट्सने दणदणीत पराभव केला. महिला संघाला हा विजय मिळवून देण्यापाठीमागे एक 17 वर्षीय फलंदाज आहे, तिचं नाव शेफाली वर्मा (shafali Verma)… या नावाची दहशत आता जागतिक महिला क्रिकेटमध्ये पसरलीय. कारण तिने कारनामाही तसाच केलाय. अवघ्या 12 चेंडूत तिने 58 धावा ठोकल्या. (indian Women Criketer shafali Verma fantastic Batting performance Against South Africa)

राजेश्वरीच्या फिरकीसमोर आफ्रिकन लेडी बॅट्समन धारातिर्थी, नंतर शेफालीचा जलवा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन टी ट्वेन्टी सामन्यात पराभव झाल्यानंतर शेवटच्या टी ट्वेन्टीमध्ये आफ्रिकेला मात देण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानात उतरला होता. या लढाईत भारतीय संघाने बाजी मारली. पहिल्यांदा राजेश्वरी गायकवाडच्या फिरकीसमोर आफ्रिकन बॅट्समन धारातिर्थी पडले. केवळ 112 रन्सवर आफ्रिकेचा संघ ऑल आऊट झाला. नंतर 17 वर्षीय फलंदाज शेफाली वर्माने कर्णधार स्मृती मंधानाच्या साथीने काही ओव्हर्समध्ये भारताला विजय मिळवून दिला.

चौकार षटकारांची बरसात

दुसऱ्या टी ट्वेन्टीत आक्रमक खेळी करणाऱ्या शेफालीचं अर्धशतक हुकलं होतं. मात्र या मॅचमध्ये तिने दणदणीत अर्धशतक ठोकलं. 30 चेंडूत तिने 60 धावांची आतिषी खेळी खेळली. यातले 58 रन्स तर तिने केवळ 12 चेंडूत केले. शेफालीने आपल्या खेळीला 7 चौकार आणि 5 षटकारांचा साज चढवला. शेफालीने या सिरीजमध्ये सर्वाधिक रन्स केले. त्यामुळे तिला प्लेअर ऑफ सिरीजचा पुरस्काराचा मान देण्यात आला.

‘जबसे बॅट पकडा सिर्फ मारा हैं…!’

मी सुरुवातीपासूनच आक्रमक पद्धतीने खेळते. जेव्हापासून मी बॅट पकडली आहे तेव्हापासून मी मारुन खेळते. आक्रमक फलंदाजी करताना मला मजा येते. तसंच मला आत्मविश्वासही येतो. जोपर्यंत माझे शॉट्स बसत नाहीत तोपर्यंत मला आत्मविशअलास येत नाही, असं शेफाली म्हणाली.

शेफाली क्रमांक 1 ची फलंदाज बनली

शेफालीने पहिल्या टी 20 सामन्यात 23 रन्स काढले होते. तर दुसऱ्या टी 20 सामन्यात 31 चेंडूत 47 रन्सची धमाकेदार इनिंग खेळली. तिसऱ्या टी 20 सामन्यात तर शेफालीने कमाल केली. अवघ्या 30 चेंडूत तिने 60 धावा ठोकल्या. अशा प्रकारे तीन सामन्यांच्या मालिकेत तिने भारताकडून सर्वोत्तम फलंदाजी केली. 15 वर्षाची असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी शेफाली आता टी 20 मध्ये क्रमांक एकची फलंदाज बनली आहे. शेफालीने ऑस्ट्रेलियाची ओपनर फलंदाज बेन मूथीला जागतिक क्रमवारीत मागे टाकलं आहे.

(ndian Women Criketer shafali Verma fantastic Batting performance Against South Africa)

हे ही वाचा :

India vs England 1st Odi | इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्याची शानदार कामगिरी

India vs England 2021, 1st odi | टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल, इंग्लंडवर 66 धावांनी शानदार विजय