मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघानं चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. पुढच्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करताच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यावेळी एक वेगळचं दृष्य पाहायला मिळालं. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिज फलंदाजी करत असताना ब्रेकमध्ये राखीव खेळाडू मैदानात फळं भरलेला ट्रे घेऊन आली. हा ट्रे पाहून मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा रंगली. स्मृती मंधाना, कर्णधार हरमनप्रीत कौर, रेणुका सिंग आणि रिचा घोष धावत ट्रे घेऊन आलेल्या खेळाडूकडे धावले.
वेस्ट इंडिजने 10 षटकात 1 गडी गमवून 53 धावा केल्या होत्या. तेव्हा खऱ्या अर्थाने वेस्ट इंडिज संघ मजबूत स्थितीत होता. त्यामुळे एनर्जी मिळणं आवश्यकच होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.राखीव खेळाडूने आणलेल्या ट्रेमध्ये केळी, सफरचंद, द्राक्षं आणि ज्यूस होता. आयसीसीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओखाली युजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 3 लाखाहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे.
एका युजर्सने लिहिलं आहे की, तिथे पोरं हार्दिक पांड्याला पाणी पण देत नाहीत आणि इथे फ्रूट पार्टी होत आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, काही दिवसांनी कोहली समोसे आणि चटनी मागवेल मैदानात..तिसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, देवींना फळांचा भोग लावला. आयसीसी वर्ल्डकप गुणतालिकेत भारतीय महिला संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढचा सामना इंग्लंडशी होणार आहे. उपांत्य फेरीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
“आमच्यासाठी चांगला दिवस होता.आम्हाला जे अपेक्षित होते ते आम्ही करू शकलो. दीप्तीवर आम्ही टीम मीटिंगमध्ये याबद्दल चर्चा केली.गोलंदाजी प्रशिक्षकाने तिला मदत केली.ऋचा घोष अशी व्यक्ती आहे जी नेहमी आमच्यासाठी विजय खेचून आणते. ती खूप आक्रमक बॅटर आहे.आम्ही निकालावर खूश आहोत आणि पुढचा सामना खूप महत्त्वाचा आहे.फक्त लय सुरू ठेवायची आहे.”, असं भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं.
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.