मुंबई : टीम इंडियाचा (IND) न्यूझिलंड(NZ) दौरा नुकताच संपला, येत्या चार डिसेंबरपासून बांगलादेशचा (BAN) दौरा सुरु होणार आहे. बांगलादेशमध्ये टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI)न्यूझिलंड दौऱ्यात अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला होता. न्यूझिलंड दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. टीम इंडियाने न्यूझिलंडमधील एकदिवसीय मालिका गमावली, तर T20 मालिका जिंकली.
बांगलादेश दौऱ्यात काही वरिष्ठ खेळाडू सोडले, तर टीम इंडियामध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तात्काळ बाहेर काढा अशी मागणी चाहत्यांनी केली होती. त्यामुळे भविष्यात टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार आहे.
चार डिसेंबरला टीम इंडियाचा पहिला सामना होईल. दुसरा सामना सात डिसेंबरला होईल. तिसरा सामना दहा डिसेंबरला होईल. तसेच पहिली कसोटी 14-18 डिसेंबर दरम्यान होईल, दुसरी कसोटी 22-26 डिसेंबर दरम्यान होईल.
विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव या दोन फलंदाजांनी चाहत्यांची मनं जिंकली. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडने पराभव केला. त्यानंतर टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडू निराश झाल्याचे पाहायला मिळाले.
भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शारदा सुंदर ठाकूर, मोहम्मद.शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, यश दयाल.