IndvsAus : ऑस्ट्रेलियाच्या 154 धावा, भारताला 174 धावांची गरज

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

ब्रिस्बेन टी 20 :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी ट्वेण्टी सामन्यात  पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे हा सामना 17 षटकांचा खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने 17 षटकात 4 बाद 154 धावा केल्या. त्यामुळे डकवर्थ लुईसनुसार भारतासमोर 174 धावाचं लक्ष आहे. या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.   ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूत 46 धावा […]

IndvsAus : ऑस्ट्रेलियाच्या 154 धावा, भारताला 174 धावांची गरज
Follow us on

ब्रिस्बेन टी 20 :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी ट्वेण्टी सामन्यात  पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे हा सामना 17 षटकांचा खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने 17 षटकात 4 बाद 154 धावा केल्या. त्यामुळे डकवर्थ लुईसनुसार भारतासमोर 174 धावाचं लक्ष आहे. या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.   ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 24 चेंडूत 46 धावा केल्या. तर कर्णधार अॅरॉन फिंज 27 आणि ख्रिस लिनने 37 धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला 154 धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताकडून कुलदीप यादवने 2 तर खलील अहमद आणि बुमराने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात येत आहे. विराट कोहलीची टीम इंडिया कांगारुंच्या संघापेक्षा तगडी आहे. अॅरॉन फिंचची ऑस्ट्रेलियन टीम भारताचा कसा सामना करते ते पाहावं लागणार आहे.

भारतीय संघाने नोव्हेंबर 2017 पासून आतापर्यंत खेळलेल्या 7 टी ट्वेण्टी मालिका जिंकल्या आहेत.  मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने टी 20 मालिका 3-0 अशी जिंकली होती. त्यामुळे आता भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहावं लागणार आहे.

ऑस्ट्रेलियन संघ कमकुवत

ऑस्ट्रेलियाचा संघ बॉल टॅम्परिंगच्या वादातून अजून सावरलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या बॉल टॅम्परिंगप्रकरणात, कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बेनक्राफ्ट यांच्यावरील बंदी कमी करण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नकार दिला आहे. वॉर्नर आणि स्मिथ यांच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियन संघ कमकुवत बनला आहे. या दोघांवर बंदी आल्यानंतर ऑस्ट्रेलिया एकही टी-20 सीरीज जिंकू शकली नाही.

ऑस्ट्रेलियाचा सातत्याने पराभव

जूनमध्ये इंग्लंडकडून पराभव, तर झिम्बाब्वेमध्ये टी-20 सीरीजच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव, यूएईमध्ये पाकिस्तानविरुद्धची सीरीज 3-0 ने पराभूत, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून पराभव, असे एकामागोमाग एक पराभव ऑस्ट्रेलियन संघाला पचवावे लागले आहेत. आता होम ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियन संघ काही चमत्कार घडवतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विराट इज बॅक

भारतीय संघात विराट कोहली परतला आहे. विंडीजविरुद्धच्या तिन्ही टी ट्वेण्टी सामन्यांमधून विराटला विश्रांती देण्यात आली होती. विराटच्या परतीनंतर अर्थात टीम इंडिया आणखी मजबूत झाली आहे.

भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोन्ही विकेटकीपरना संधी देण्यात आली आहे. पंत हा विकेटकीपिंग सांभाळेल. तर हार्दिक पंड्याच्या जागी त्याचा भाऊ कृणाल पांड्या अष्टपैलूची भूमिका बजावेल. भारतीय गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि खलील अहमद यांच्या खांद्यावर असेल. तर कुलदीप यादव फिरकीची बाजू सांभाळणार आहे.

ऑस्ट्रेलियाकडे ग्लेन मॅक्सवेल एकमेव फिरकीपटू आहे, मात्र त्यांच्याकडे भारतापेक्षा जास्त वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे.

भारतीय संघ:  रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार),  केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर),  दिनेश कार्तिक, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह,  खलील अहमद.

ऑस्ट्रेलिया:  अरॉन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, क्रिस लिन,  ग्लेन मॅक्सवेल,  मार्कस स्टोइनिस,  बेन मॅकडरमॉट,  एलेक्स केरी (विकेटकीपर),  नाथन कूल्टर नाइल, अँड्रयू टाईय, जेसन बेहरेनडोर्फ, बिली स्टेनलेक

21, 23 आणि 25 नोव्हेंबरला टी ट्वेण्टी सामने, तर 6 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर वन डे सामने खेळवण्यात येणार आहेत.