IPL 2020 : CSK चे सलग दोन पराभव, सुरेश रैना परतणार का? संघ व्यवस्थापक म्हणतात….

| Updated on: Sep 26, 2020 | 4:50 PM

सुरेश रैनाला संघात परत बोलवा, अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. | (CSK Team Ceo On Suresh Raina )

IPL 2020 : CSK चे सलग दोन पराभव, सुरेश रैना परतणार का? संघ व्यवस्थापक म्हणतात....
Follow us on

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) खराब सुरुवात झाली आहे. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यांपैकी 2 सामन्यात सलग पराभव झाला आहे. चेन्नईच्या या खराब कामगिरीमुळे सुरेश रैनाला (Suresh Raina) संघात परत बोलवा, अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. मात्र आयपीएलच्या या हंगामात रैनाचं खेळणं अशक्य असल्याचं चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी म्हटलं आहे. सुरेश रैनाने काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा 13 व्या हंगामातून माघार घेतली आहे. ( CSK Team Ceo On Suresh Raina )

“आयपीएलच्या या 13 व्या हंगामात संघासाठी उपलब्ध नसणार, अशी माहिती रैनाने दिली. रैनाच्या या निर्णयाचा आम्ही आदर करतो. रैनाला या मोसमासाठी परत बोलवण्याबाबत आमचा कोणताही विचार नाही”,असं काशी विश्वनाथ म्हणाले.

“चेन्नई दमदार पुनरागमन करणार”

“चेन्नईचा राजस्थान आणि दिल्ली विरोधात सलग दुसरा पराभव झाला. मात्र यानंतर चेन्नई दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास काशी विश्वनाथने व्यक्त केला आहे. चेन्नईचे अनेक चाहते आहेत. ते चेन्नईला सपोर्ट करतात. चेन्नई लवकरच स्पर्धेत कमबॅक करेल, आम्ही चाहत्यांची निराशा करणार नाही”, असंही काशी विश्वनाथ यांनी नमूद केलं.

अंबाती रायुडू लवकरच मैदानात

यावेळेस काशी विश्वनाथने अंबाती रायुडूबद्दल ही वक्तव्य केलं. “हैदराबाद विरुद्ध 2 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यात रायुडू संघात असेल, असा आशावाद काशी विश्वनाथे व्यक्त केला. रायुडू दुखापतीमुळे मागील 2 सामन्यात खेळू शकला नाही. रायुडूच्या अनुपस्थितीत चेन्नईचा मध्यक्रम ढासळला आहे”,अशी कबूली काशी विश्वनाथ दिली.

चेन्नईने आयपीएलच्या 13 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली होती. मात्र राजस्थान आणि दिल्लीविरोधातील सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान चेन्नईकडून फिरकीपटु हरभजन सिंह आणि मुंबईच्या लसिथ मलिंगानेही आयपीएलच्या या मोसमातून माघार घेतली आहे.

संबंधित बातम्या : 

Suresh Raina | धोनीशी वाद झाल्याने रैनाची माघार ? CSK मालक श्रीनिवास यांचा दुजोरा

Suresh Raina | चेन्नई सुपर किंग्जला धक्क्यावर धक्के, सुरेश रैना IPL मधून बाहेर

Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा

( CSK Team Ceo On Suresh Raina )