मुंबई : आयपीएल 2020 चा 13 वा मौसम संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमध्ये खेळवला जाण्याची शक्यता बळावली आहे. 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत ‘आयपीएल 2020’चा हंगाम रंगण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे दीर्घ काळापासून आसुसलेल्या क्रीडा रसिकांना पर्वणी मिळू शकते. (IPL 2020 All you want to know about IPL 2020 dates schedule and format)
आयसीसीने टी20 विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय अधिकृतपणे घोषित केला आणि आयपीएल 2020 भारताबाहेर खेळवण्यास स्थानिक प्रशासनाने बीसीसीआयला मान्यता दिली, तर सप्टेंबर महिन्यात ‘आयपीएल 2020’ सुरु होऊ शकते.
भारताला कोरोनाचा मोठा फटका बसला असून बहुतांश शहरांना त्यातून सावरण्यासाठी मोठा काळ लागू शकतो, या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने ‘आयपीएल 2020’ भारताबाहेर नेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
‘आयपीएल 2020’ साठी यूएईच का?
यूएईमध्ये क्वारंटाईनचे नियम कडक नाहीत, तेथील बाजारपेठा आणि मॉल्स आधीच खुले झाले आहेत. कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थिती आहे आणि पर्यटकांचेही स्वागत केले जात आहे. त्यातच यूएईमध्ये आयपीएल खेळवण्यास विरोध करणाऱ्या जनहित याचिकाही स्थानिक कोर्टात दाखल होण्याची चिन्हं कमी आहेत.
आयपीएल 2020 साठी 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान कालावधी रिक्त आहे. बीसीसीआयने आयपीएलसाठी 26 सप्टेंबर ही संभाव्य तारीख ठरवल्याचे वृत्त आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दिली होती.
‘आयपीएल’ भारतासाठी खूप महत्वाचे आहे. ते भारताच आयोजित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. आम्ही 4 ते 5 ठिकाणी याचे आयोजन करण्याच्या विचारात आहोत. परंतु तसे झाले नाही, तर ते भारताबाहेर नेण्याचा मार्ग स्वीकारु. सर्व पर्याय आमच्यासाठी खुले आहेत” असे गांगुली त्यावेळी म्हणाले होते. परंतु सद्यपरिस्थिती पाहता आयपीएल 2020 देशाबाहेर खेळवली जाण्याची शक्यता बळावली आहे.
क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली टी20 लीग ‘आयपीएल 2020’ मार्चपासून सुरु होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. (IPL 2020 All you want to know about IPL 2020 dates schedule and format)