शारजा : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings) 5 विकेटने दणदणीत विजय मिळवला. गब्बर शिखर धवन दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. शिखर धवनने (Shikhar Dhawan) आयपीएलमधलं आपलं पहिलंवहिलं शतकं झळकावलं. चेन्नईने दिल्लीला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने 1 चेंडूआधी 5 विकेट गमावून पूर्ण केलं. दिल्लीने 185 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने नाबाद 101 धावा केल्या. तर अक्षर पटेलने निर्णायक क्षणी 5 चेंडूत 21 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
Gabbar Roars at Sharjah!
A 101* from @SDhawan25 as @DelhiCapitals win by 5 wickets in Match 34 of #Dream11IPL.#DCvCSK pic.twitter.com/FiwVwGgs07
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची निराशाजनक सुरुवात राहिली. दिल्लीला पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर पहिला झटका लागला. पृथ्वी शॉ शून्यावर आऊट झाला. यानंतर दिल्लीला दुसरा धक्का 26 धावांवर लागला. अजिंक्य रहाणे 8 धावांवर बाद झाला. रहाणेनंतर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात आला. अय्यर-धवनने तिसऱ्या विकेटसाठी 68 धावा जोडल्या. ही जोडी फोडायला ड्वेन ब्राव्होला यश आलं. त्याने श्रेयसला 23 धावांवर बाद केलं.
एकाबाजूला विकेट जात असताना ‘गब्बर’ शिखर धवन मैदानात तंबू ठोकून उभा होता. अय्यरनंतर मार्कस स्टोइनिस मैदानात आला. धवन-मार्कस या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या. मार्क्स स्टोइनिस 24 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या अॅलेक्स कॅरीही बाद झाला. यादरम्यान गब्बरने आयपीएलमधील पहिलं शतकं पूर्ण केलं. अॅलेक्सनंतर अक्षर पटेल मैदानात आला. अक्षर पटेलने धमाकेदार खेळी केली. अक्षरने षटकार खेचत दिल्लीला विजय मिळवून दिला. शिखर धवनने 58 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. याखेळीत त्याने 14 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर अक्षर पटेलने 5 चेंडूत धमाकेदार नाबाद 21 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर सॅम करन, शार्दूल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या चेन्नईची खराब सुरुवात झाली. सॅम करन पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शेन वॉटसन आणि फॅफ डु प्लेसिसने 87 धावांची भागीदारी केली. यानंतर शेन वॉटसन 36 धावावंर बाद झाला. यानंतर अंबाती रायुडू मैदानात आला. रायुडूच्या मदतीने काही ओव्हर फॅफने चेन्नईचा धावफळक हलता ठेवला. यादरम्यान फॅफने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र 58 धावांवर फॅफ आऊट झाला. त्याने या खेळीत 2 सिक्स आणि 6 फोर लगावले. धोनीने आजही निराशा केली. धोनी 3 धावांवर बाद झाला.
यानंतर अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजाने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शेवटच्या 21 चेंडूत या जोडीने 50 धावांची भागीदारी केली. या दरम्यान रवींद्र जडेजाने फटकेबाजी केली. रवींद्र जडेजाने 13 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी केली. यात त्याने 4 सिक्स लगावले. चेन्नईने 4 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 179 धावा केल्या. चेन्नईकडून फॅफ डु प्लेसिसने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर अंबाती रायुडूने नाबाद 45 रन्सची खेळी केली. दिल्लीकडून एनरिच नोर्तजने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर खगिसो रबाडा आणि तुषार देशपांडे या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
[svt-event title=”दिल्लीचा शानदार विजय” date=”17/10/2020,11:19PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : धवनचे धमाकेदार शतक, चेन्नईवर 5 विकेट्सने विजय, पॉइंट्सटेबलमध्ये दिल्लीने गाठलं ‘शिखर’ https://t.co/oMZW3CRiqC #IPL2020 #CSK #DC #DCvsCSK #Gabbar #ShikharDhawan #AxarPatel #Dhawan
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 6 चेंडूत 17 धावांची आवश्यकता” date=”17/10/2020,11:14PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्लीला विजयासाठी 6 चेंडूत 17 धावांची आवश्यकता https://t.co/oMZW3CRiqC #IPL2020 #CSK #DC #DCvsCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”शिखर धवनचे शतक” date=”17/10/2020,11:12PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : ‘गब्बर’ शिखर धवनचे शानदार शतक https://t.co/oMZW3CRiqC #CSK #DC #DCvsCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”दिल्लीचा निम्मा संघ तंबूत” date=”17/10/2020,11:05PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्लीला पाचवा धक्का, अॅलेक्स कॅरी आऊट https://t.co/oMZW3CRiqC
#CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 24 चेंडूत 41 धावांची आवश्यकता” date=”17/10/2020,10:53PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्ली 139-4 (16 Over)
शिखर धवन- 81*, अॅलेक्स कॅरी-1*https://t.co/oMZW3CRiqC #IPL2020 #CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”दिल्लीला चौथा दणका” date=”17/10/2020,10:49PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्लीला चौथा धक्का, मार्कस स्टोइनिस आऊट https://t.co/oMZW3CRiqC #CSK #DC #DCvsCSK #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 51 धावांची आवश्यकता” date=”17/10/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्ली 129-3 (15 Over)
शिखर धवन- 79*, मार्कस स्टोयनिस-17*https://t.co/oMZW3CRiqC #IPL2020 #CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”दिल्लीला तिसरा झटका” date=”17/10/2020,10:33PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्लीला तिसरा झटका, कर्णधार श्रेयस अय्यर बाद https://t.co/oMZW3CRiqC
#CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”गब्बर अर्धशतक” date=”17/10/2020,10:17PM” class=”svt-cd-green” ]
FIFTY!
A well made half-century for @SDhawan25 off 29 deliveries. This is his 40th IPL 50.#Dream11IPL pic.twitter.com/vQtsVKxx3L
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
[svt-event title=”8 ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोअर” date=”17/10/2020,10:10PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्ली 60-2 (8 Over)
शिखर धवन- 39*, श्रेयस अय्यर-12*https://t.co/oMZW3CRiqC #IPL2020 #CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर दिल्ली” date=”17/10/2020,9:57PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्ली 41-2 (6 Over)
शिखर धवन- 24*, श्रेयस अय्यर-8*https://t.co/oMZW3CRiqC #IPL2020 #CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”दिल्लीला दुसरा झटका” date=”17/10/2020,9:52PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्लीला दुसरा झटका, अजिंक्य रहाणे आऊट https://t.co/oMZW3CRiqC
#CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”दीपक चहरची विकेट मेडन” date=”17/10/2020,9:33PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्ली 0-1 (1 Over)
शिखर धवन- 0*, अजिंक्य रहाणे-0*https://t.co/oMZW3CRiqC #IPL2020 #CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”दिल्लीला पहिला झटका” date=”17/10/2020,9:28PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्लीला पहिला झटका, पृथ्वी शॉ शून्यावर बाद https://t.co/oMZW3CRiqC #IPL2020 #CSK #DC #DCvsCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”दिल्लीच्या फलंदाजीला सुरुवात” date=”17/10/2020,9:26PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : दिल्लीच्या फलंदाजीला सुरुवात, विजयासाठी 180 धावांचे आव्हान https://t.co/oMZW3CRiqC #IPL2020 #CSK #DC #DCvsCSK
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 180 धावांचे आव्हान ” date=”17/10/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : चेन्नईच्या फलंदाजांची फटकेबाजी, दिल्लीला विजयासाठी 180 धावांचे आव्हान https://t.co/oMZW3CRiqC
#CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”चेन्नई 19 ओव्हरनंतर” date=”17/10/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : चेन्नई 163-4 (19 Over)
रवींद्र जडेजा- 18*, अंबाती रायुडू-44*https://t.co/oMZW3CRiqC #IPL2020 #CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”चेन्नईला चौथा धक्का” date=”17/10/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : चेन्नईला चौथा धक्का, महेंद्रसिंह धोनी आऊट https://t.co/oMZW3CRiqC
#CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”चेन्नईला तिसरा धक्का” date=”17/10/2020,8:40PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : चेन्नईला तिसरा धक्का, अर्धशतकी खेळीनंतर फॅफ डु प्लेसिस बादhttps://t.co/oMZW3CRiqC
#CSK #DC #DCvsCSK #FafDuPlesis— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”14 ओव्हरनंतर चेन्नई” date=”17/10/2020,8:37PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : चेन्नई 105-2 (14 Over)
फॅफ डु प्लेसिस- 54*, अंबाती रायुडू-14*https://t.co/oMZW3CRiqC #IPL2020 #CSK #DC #DCvsCSK— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”चेन्नईला दुसरा धक्का” date=”17/10/2020,8:27PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : चेन्नईला दुसरा धक्का, शेन वॉटसन आऊट https://t.co/oMZW3CRiqC #CSK #DC #DCvsCSK #FafDuPlesis
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”फॅफ डु प्लेसिसच अर्धशतक” date=”17/10/2020,8:26PM” class=”svt-cd-green” ]
FIFTY!
Another half-century for @faf1307 in #Dream11IPL 2020.
Live – https://t.co/LC2biyWd5Z #DCvCSK pic.twitter.com/Zk1jJIjQtU
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
[svt-event title=”चेन्नईचा 9 ओव्हरनंतर स्कोअर” date=”17/10/2020,8:11PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : चेन्नई 56-1 (9 Over)
फॅफ डु प्लेसिस- 31*, शेन वॉटसन-24*https://t.co/oMZW3CRiqC— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
[svt-event title=”चेन्नई पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर” date=”17/10/2020,7:59PM” class=”svt-cd-green” ]
At the end of the powerplay, #CSK are 39/1
Live – https://t.co/LC2biyWd5Z #Dream11IPL pic.twitter.com/kI5rApMmj2
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
[svt-event title=”सॅम करन शून्यावर बाद” date=”17/10/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]
Tushar Deshpande strikes in the first over. Sam Curran departs for a duck.
Nortje with a great catch at the boundary ropes.
Live – https://t.co/LC2biyWd5Z #Dream11IPL pic.twitter.com/7H8tqDE2S3
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
[svt-event title=”दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू” date=”17/10/2020,7:34PM” class=”svt-cd-green” ]
A look at the Playing XI for #DCvCSK#Dream11IPL pic.twitter.com/7LaT67jD05
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
[svt-event title=”दिल्लीचे अंतिम 11 खेळाडू” date=”17/10/2020,7:34PM” class=”svt-cd-green” ]
Match 34. Delhi Capitals XI: P Shaw, S Dhawan, A Rahane, S Iyer, M Stoinis, A Carey, A Patel, R Ashwin, K Rabada, A Nortje, T Deshpande https://t.co/GAi9ISC25F #DCvCSK #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
[svt-event title=”चेन्नईचे अंतिम 11 खेळाडू” date=”17/10/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]
Match 34. Chennai Super Kings XI: S Curran, F du Plessis, S Watson, A Rayudu, MS Dhoni, K Jadhav, R Jadeja, DJ Bravo, D Chahar, K Sharma, S Thakur https://t.co/GAi9ISC25F #DCvCSK #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
[svt-event title=”चेन्नईने टॉस जिंकला” date=”17/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, DC vs CSK Live : चेन्नई सुपर किंग्जसचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णयhttps://t.co/oMZW3CRiqC
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2020
The Sharjah Cricket Stadium will host Match 34 of #Dream11IPL 2020 where #DelhiCapitals will take on #CSK
Preview by @ameyatilak https://t.co/akLwn5WbyJ #DCvCSK pic.twitter.com/5QaTUI3Hcz
— IndianPremierLeague (@IPL) October 17, 2020
दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी केली आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत. यापैकी 6 सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे. तर केवळ 2 सामन्यातच पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये 2 ऱ्या क्रमांकावर आहे. तर 3 वेळा जेतेपद पटकावलेल्या चेन्नईने यंदाच्या मोसमात निराशानजक कामगिरी केली आहे. चेन्नईने खेळलेल्या 8 सामन्यांपैकी फक्त 3 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तर 5 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नई अंकतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे.
#MumbaiIndians are back on top in the Points Table after Match 32 of #Dream11IPL. pic.twitter.com/eRf9uQ2YRq
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
आयपीएल स्पर्धेत दिल्ली आणि चेन्नई एकूण 22 सामन्यात समोरासमोर आले आहेत. या 22 सामन्यांपैकी 15 सामन्यात चेन्नईने दिल्लीवर मात केली आहे. तर दिल्लीला 7 सामने जिंकण्यास यश आले आहे. यंदाच्या मोसमात याआधी झालेल्या 25 सप्टेंबरच्या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर 44 धावांनी मात केली होती.
चेन्नई सुपर किंग्जस : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायुडू, फॅफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, पीयूष चावला, इमरान ताहिर, मिचेल सेंटनर, जोश हेझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, खगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डेनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिच नॉर्तजे, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्क्स स्टोयनिस आणि ललित यादव.
संबंधित बातम्या :
CSK vs DC : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्लीची चेन्नईवर 44 धावांनी मात
IPL 2020, RR vs RCB Live : राजस्थान रॉयल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे तगडे आव्हान
ipl 2020 dc vs csk live score update today cricket match delhi capitals vs chennai super kings live