दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 51 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात मुंबईने दिल्लीवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. मुंबईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा सलामीवर पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी ठरला. पृथ्वी शॉ मागील काही सामन्यांपासून निराशाजनक कामगिरी करतोय. यामुळे त्याला चांगलेच ट्रोल केलं आहे. पृथ्वीला मीम्सद्वारे ट्रोल केलं जात आहे. तसेच पृथ्वी ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आला आहे. ipl 2020 dc vs mi prithvi shaw consistently disappointing performance trolls on social media memes go viral
सुरुवातीच्या काही सामन्यात पृथ्वी चांगली खेळी करत होता. मात्र त्यानंतर पृथ्वीला संघर्ष करावा लागला. वारंवार संधी दिल्यानंतरही पृथ्वीला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पृथ्वीला काही सामन्यातून डच्चू देण्यात आला. मात्र त्यानंतरही आजच्या सामन्यात पृथ्वीने निराशाजनक कामगिरी केली.
*after watching Prithvi Shaw batting in IPL*
Shreyas lyer to Shaw:
???#PrithviShaw #MIvsDC pic.twitter.com/pV2ucYuvWB— Vishal Singh (@VishalSingh8445) October 31, 2020
Everytime #PrithviShaw goes to bat.#ShreyasIyer be like – #ipl2020#DCvsMI pic.twitter.com/kWMQJbrnbt
— Shriniwas Deshpande (@deshpandeshree_) October 31, 2020
#DCvMI
Me to #PrithviShaw And #DC's batting.
?????#MIvsDC #DCvsMi#IPL2020 pic.twitter.com/69j21UTGo8— ⚡☆ ???ᶤ?♡ (@sumitrajmuz) October 31, 2020
Everyone to #PrithviShaw pic.twitter.com/rG5AdVjZhU
— AkmalHashmi (@AkmalHashmi20) October 31, 2020
#PrithviShaw after scoring 10 runs with S.R of 90+#MIvsDC pic.twitter.com/g5C2Ed1zaH
— Nk (@domnik_nk) October 31, 2020
पृथ्वीने आयपीएलच्या 13 व्या मोसमात एकूण 11 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 137.73 च्या स्ट्राईक रेटने आणि 19.90 च्या सरासरीने 219 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
मोसमाच्या सुरुवातीला चांगल्या कामगिरीनंतर दिल्लीचा सलग 4 सामन्यात पराभव झाला. दिल्ली या मोसमातील साखळी फेरीतील शेवटचा सामना 2 नोव्हेंबरला खेळणार आहे. दिल्लीची या सामन्यात ‘करो या मरो’ ची परिस्थिती असणार आहे. तसेच दिल्लीवर प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचाही धोका आहे. ताज्या आकडेवारीनुसार दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020, DC vs MI : इशान किशनची शानदार खेळी, मुंबईचा दिल्लीवर 9 विकेट्सने दणदणीत विजय
ipl 2020 dc vs mi prithvi shaw consistently disappointing performance trolls on social media memes go viral