IPL 2020, RR vs DC : दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनचा ‘गब्बर’ रेकॉर्ड, विराट कोहलीचा विक्रम मोडित

| Updated on: Oct 15, 2020 | 12:38 AM

दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनने केलल्या अर्धशतकी खेळीसाठी 'अल्ट्रोज सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच' या पुरस्काराने गौरवण्यात आले.

IPL 2020, RR vs DC : दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनचा गब्बर रेकॉर्ड, विराट कोहलीचा विक्रम मोडित
Follow us on

दुबई : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 13 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीने पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि गब्बर शिखर धवन (Shikhar Dhawan) दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. श्रेयस अय्यर आणि गब्बर शिखर धवनने अर्धशतकी खेळी केली. शिखरने 33 चेंडूंच्या मदतीने धमाकेदार 57 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 सिक्स आणि 6 फोर लगावले. या खेळीसह शिखरने विक्रमाला गवसणी घातली आहे. IPL 2020 Delhi Capitals’ Shikhar Dhawan breaks Bangalore’s Virat Kohli’s record for most fifties

काय आहे विक्रम?

राजस्थानविरुद्धचं अर्धशतक हे शिखर धवनच्या आयपीएल कारकिर्दीतील 39 वे अर्धशतक ठरलं. यासह धवनने विराट कोहलीच्या सर्वाधिक अर्धशतकांचा रेकॉर्ड ब्रेक करत विक्रमाला गवसणी घातली. यासोबतच धवन पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत विराट कोहली आणि सुरेश रैना 38 अर्धशतकांसह  दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक चौकार

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा यादीत धवन ‘शिखरावर’ आहे. आयपीएलमध्ये शिखर धवनच्या नावे 594 चौकारांची नोंद झाली आहे. शिखरने हा विक्रम अवघ्या 167 सामन्यांमध्ये केला आहे. सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत शिखरच्या आसपास कोणीही नाही. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आहे. विराटच्या नावावर 494 फोरची नोंद आहे. विराटने ही कामगिरी 184 सामन्यात केली आहे. त्यामुळे चौकारांच्या रेकॉर्डबाबतीत धवन ‘शिखरावर’ आहे.

शिखर धवनने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. या 8 सामन्यात त्याने 133 च्या स्ट्राईक रेटने 258 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 69 धावांची खेळी ही त्याच्या यंदाच्या मोसमातील सर्वोच्च खेळी राहिली आहे.

श्रेयस अय्यरच्या 1 हजार धावा

श्रेयस अय्यरने 43 चेंडूत 53 धावा केल्या. यामध्ये त्याने 3 फोर आणि 2 सिक्स लगावले. या खेळीसह श्रेयस अय्यरच्या कर्णधार म्हणून 1 हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान दिल्लीने आतापर्यंत एकूण खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. यासह दिल्ली 12 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सची राजस्थान रॉयल्सवर 13 धावांनी मात

IPL 2020 Delhi Capitals’ Shikhar Dhawan breaks Bangalore’s Virat Kohli’s record for most fifties