IPL 2020 DC vs KXIP : सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात

| Updated on: Oct 16, 2020 | 1:05 PM

दिल्लीने पंजाबला विजयासाठी 158 धावांचे आव्हान दिले आहे. | IPL 2020 delhi capitals vs kings eleven punjab live cricket score

IPL 2020 DC vs KXIP : सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात
Follow us on

दुबई :  सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला आहे. विजयासाठी मिळालेल्या 3 धावाचं लक्ष्य दिल्लीने सहज पूर्ण केलं. हा सुपर ओव्हरचा सामना यंदाच्या मोसमातला पहिलाच सामना ठरला.

सुपर ओव्हरमध्ये कागिसो रबाडाच्या गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने सहज पंजाबवर विजय मिळवला. रबाडाने दोन विकेट्स मिळवत फक्त दोन धावा दिल्या. त्यामुळेच दिल्ली संघाचा विजय झाला. दोन्ही संघाने समान धावा केल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. पण रबाडाच्या भेदक गोलंदाजीने दिल्ली संघाचने पंजाबवर विजय मिळवला.

शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या मॅचमध्ये दिल्लीने आक्रमक बोलिंगने पंजाबला 157 धावांवर रोखण्यास यश आले. अगरवालने केलेल्या 89 धावांमुळे पंजाब विजयाजवळ आला होता. मात्र स्टोयनिसने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्याने स्कोअर लेव्हल झाला आणि मॅच बरोबरीत सुटली.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या पंजाबची सावध सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी कर्णधार लोकेश राहूल आणि मयंक अगरवाल यांच्यात 30 धावांची पार्टनरशीप झाली. मोहित शर्माने दिल्लीला पहिली विकेट मिळवून दिली. मोहित शर्माने लोकेश राहुलला 21 धावांवर बोल्ड केले.

यानंतर आलेल्या करुण नायर, निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल या तिकडीला विशेष काही करता आले नाही. पंजाब एकामागोमाग एक विकेट गमावत होता. क्रिष्णपा गौतम आणि सलामीवीर मयंक अगरलवाल या दोघांनी पंजाबचा डाव सावरला. या दोघांनी 46 धावांची भागीदारी केली. यानंतर क्रिष्णपा गौतम 20 धावा करुन बाद झाला. यामागोमाग मयंक अगरवाल ही 89 धावा करुन बाद झाला. दिल्लीकडून खगिसो रबाडा आणि आर आश्विनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

दरम्यान याआधी पंजाबने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंग करण्यास भाग पाडले. फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीची निराशाजनक सुरुवात झाली. दिल्लीने पहिले 3 विकेट 4 ओव्हरमध्येच गमावले. दिल्लीच्या शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामीच्या जोडीला विशेष काही करता आले नाही. यानंतर शिमरॉन हेटमायरही 7 धावा करुन तंबूत परतला.

यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. या जोडीला तोडण्यास रवी बिश्नोईला यश आले. बिश्नोईने ऋषभ पंतला 31 धावांवर बाद केले. यानंतर पुन्हा एकदा दिल्लीचा डाव अडखळला. मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये मार्क्स स्टोइनिसने तुफान करत गरजेच्या वेळेस अर्धशतक ठोकले. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 157 धावा केल्या. दिल्लीकडून सर्वाधिक 53 धावा मार्क्स स्टोइनिसने केल्या. त्या खालोखाल श्रेयस अय्यरने 39 तर ऋषभ पंतने 31 धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

[svt-event title=”सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा विजय” date=”20/09/2020,11:40PM” class=”svt-cd-green” ]

 

[svt-event title=”IPL 2020 DC vs KXIP, सुपर ओव्हर Live : के एल राहूल 2 धावा करुन माघारी ” date=”20/09/2020,11:31PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सामना अनिर्णित” date=”20/09/2020,11:23PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबला पाचवा धक्का” date=”20/09/2020,10:30PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबची चौथी विकेट ” date=”20/09/2020,10:16PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबला तिसरा धक्का” date=”20/09/2020,10:11PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबला दुसरा धक्का” date=”20/09/2020,10:04PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”IPL 2020 DC vs KXIP Live : पंजाबला पहिला झटका ” date=”20/09/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”विजयी आव्हानाचे पाठलाग करताना पंजाबची सावध सुरुवात ” date=”20/09/2020,9:49PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीकडून पंजाबला विजयासाठी 158 धावांचे आव्हान” date=”20/09/2020,9:40PM” class=”svt-cd-green” ] दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 157 धावा केल्या. दिल्लीकडून मार्क्स स्टोइनिसने सर्वाधिक 53 धावा केल्या. [/svt-event]

[svt-event title=”मार्क्स स्टोइनिसची तुफान खेळी” date=”20/09/2020,9:19PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीला सहावा दणका, अक्षर पटेल माघारी ” date=”20/09/2020,8:57PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीचा निम्मा संघ माघारी ” date=”20/09/2020,8:47PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीला पाचवा झटका” date=”20/09/2020,8:40PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीला चौथा झटका ” date=”20/09/2020,8:37PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी” date=”20/09/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंत-अय्यरने दिल्लीचा डाव सावरला ” date=”20/09/2020,8:14PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सातव्या ओव्हर अखेरीस दिल्ली कॅपिटल्स” date=”20/09/2020,8:05PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीला धक्क्यावर धक्के” date=”20/09/2020,7:55PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा धक्का ” date=”20/09/2020,7:48PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीची पहिली विकेट, शिखर धवन रनआऊट ” date=”20/09/2020,7:38PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पहिल्या ओव्हर अखेरीस दिल्ली कॅपिटल्स ” date=”20/09/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”किंग्स इलेवन पंजाबचे – 11 खेळाडू ” date=”20/09/2020,7:18PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्ली कॅपिटल्सचे 11 शिलेदार” date=”20/09/2020,7:11PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणाचा निर्णय” date=”20/09/2020,7:02PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्ली कॅपिटल्ससमोर किंग्ज इलेव्हन पंजाबचं तगडं आव्हान” date=”20/09/2020,6:19PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंजाबकडे आक्रमक फंलदाज ” date=”20/09/2020,5:53PM” class=”svt-cd-green” ] पंजाबकडे ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार केएल राहुल यासारखे स्फोटक खेळी करणारे फलंदाज आहेत. आयपीएलच्या इतिहासात या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या फलंदाजांमुळे दिल्लीच्या गोलंदाजांना सावध रहावं लागणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज ईलेव्हन पंजाब आमनेसामने ” date=”20/09/2020,6:05PM” class=”svt-cd-green” ]