दुबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात (IPL 2020 Final) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. रोहित शर्मा (Mumbai Indians Captain Hitman Rohit Sharma) मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितने 51 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावांची विजयी खेळी केली. मुंबईने विजेतेपद पटकावण्याची ही 5 वी वेळ ठरली. मुंबईकर रोहितने या 5 ही वेळा आपल्या नेतृत्वात मुंबईला विजेतेपद मिळवून दिलं. रोहित हा आयपीएलमधील यशस्वी खेळाडू आणि एकमेव कर्णधार आहे. आयपीएलच्या इतिहासात रोहितने असाधारण कामगिरी केली आहे. या निमित्ताने रोहितने आयपीएल कारकिर्दीत केलेली लक्षणीय कामगिरी पाहणार आहोत. ipl 2020 final mi vs dc hitman rohit sharma successful player and captain in the history of ipl
Ladies and Gentlemen, presenting to you FIVE TIME IPL CHAMPIONS – #MumbaiIndians #Dream11IPL pic.twitter.com/Wz2ONkrh7E
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020
रोहित हा आयपीएलमधील एकमेव यशस्वी खेळाडू आणि कर्णधार आहे. रोहित आतापर्यंत एकूण 6 वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळला आहे. रोहित 1 वेळा खेळाडू तर 5 वेळा कर्णधार म्हणून अंतिम सामन्यात खेळला आहे. या सहाही वेळा तो यशस्वी झाला आहे. रोहित 2009 मध्ये हैदराबादकडून खेळत होता. तेव्हा अंतिम सामना हैदराबाद विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळण्यात आला होता. या अंतिम सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर विजय मिळवला होता.
रोहितला 2013 मध्ये मुंबई इंडियन्स संघात समाविष्ट करण्यात आलं. रोहित तेव्हापासून मुंबईचे नेतृत्व करतोय. तेव्हापासून ते आतापर्यंत मुंबईने एकूण 5 वेळा अंतिम सामन्यात धडक मारली. आणि विजेतेपद पटकावलं. मुंबईच्या या 5 वेळच्या विजेतेपदात रोहितने कर्णधार म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे.
दिल्लीविरुद्धातील अंतिम मॅच रोहितच्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वी मॅच ठरली. आयपीएलमध्ये 200 मॅचचा पल्ला गाठणारा रोहित हा द्वितीय खेळाडू ठरला आहे. रोहितआधी चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने या मोसमातच 200 वी मॅच खेळली होती.
200th outing for @ImRo45 in IPL.
Will this be a memorable one?#Dream11IPL #Final pic.twitter.com/0Z9NyHJyQk
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020
रोहितने आयपीएलमधील एकूण 200 सामन्यात 130.61 च्या स्ट्राईक रेटने आणि 31.31 च्या सरासरीने 5 हजार 230 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 109* ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
रोहितने बोलिंग करतानाही 15 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे रोहितने 2009 मध्ये म्हणजेच आयपीएलच्या 2 ऱ्या मोसमात हॅट्रिक घेण्याची कामगिरीही केली आहे. तेव्हा रोहित हैदराबादचे प्रतिनिधित्व करत होता. म्हणजेच हैदराबादसाठी खेळत होता. तेव्हा त्याने मुंबईच्या अभिषेक नायर, हरभजन सिंह आणि जेपी ड्युमिनी या 3 फलंदाजांना बाद करत हॅट्रिक घेतली होती.
रोहितने दिल्लीविरुद्धच्या अंतिम सामन्यात मुंबईकडून खेळताना 4 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. रोहितने एक कर्णधार म्हणून ही कामगिरी केली आहे. रोहित 2013 पासून मुंबईकडून कर्णधार म्हणून खेळतोय.
4000 runs in Blue & Gold for @ImRo45 ??#Dream11IPL pic.twitter.com/59YXjn9obB
— IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020
रोहितने या वेळेस म्हणजेच 2020 विजेतेपद पटकावत स्वत:चाच एक विशेष विक्रम मोडित काढला आहे. रोहितने याआधी मुंबईला आपल्या नेतृत्वात 2013, 15, 17 आणि 19 अशा विषम वर्षात विजेतेपद मिळवून दिला होतं. मात्र यंदा सम वर्षात विजेतपद जिंकत स्वत:चीच विषम विजयी कामगिरी मोडित काढली.
संबंधित बातम्या :
IPL 2020 Final, MI vs DC : ऑरेंज कॅप मिळवण्याची ‘गब्बर’ संधी हुकली, केएल राहुलला ऑरेंज कॅपचा मान
IPL 2020 FINAL, MI vs DC : दिल्लीविरुद्ध मैदानात उतरताच ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा भीम पराक्रम
IPL 2020 Final MI vs DC : हिटमॅन रोहित शर्माची आयपीएल फायनल सामन्यांमधील कामगिरी
आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचे पर्पल कॅप विनर…
ipl 2020 final mi vs dc hitman rohit sharma successful player and captain in the history of ipl