दुबई : इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (Indian Premier League) मंगळवारी खेळवण्यात आलेल्या सनराजयर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या सामन्यात हैदराबादने दिल्लीवर 88 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. तर दिल्लीचा हा या मोसमातील सलग तिसरा पराभव ठरला आहे. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 220 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांसमोर दिल्लीचा डाव 19 षटकात आटोपला. दिल्लीचा संघ 131 धावांवर गारद झाला.
कर्णधार बर्थडे बॉय डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धीमान साहा हे दोघे हैदराबादच्या विजयाचे हिरो ठरले. हैदराबादकडून प्रथम फलंदाजी करताना या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी केली. या दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांची खूप धुलाई केली. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये सध्या सर्वाधिक विकेट घेऊन पर्पल कॅप मिरवणाऱ्या कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याच्या गोलंदाजीवरही साहा-वॉर्नरने जोरदार प्रहार केला. रबाडाच्या चार षटकात हैदराबादच्या फलंदाजांनी तब्बल 54 धावा फटकावल्या. या सामन्यात रबाडाला एकही विकेट मिळवता आली नाही.
तीन वर्षांपासून सुरु असलेल्या विजयरथ रोखला
इथे सर्वांना वाटत असेल की रबाडाला विकेट मिळाली नाही, यात कोणती मोठी गोष्ट. असं अनेक गोलंदाजांच्या बाबतीत घडतं. मात्र रबाडाच्या बाबतीत गोष्ट थोडी वेगळी आहे. कगिसो रबाडा 2017 पासून आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात एक किंवा त्यापेक्षा जास्त विकेट मिळवत आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून त्याचा विजयरथ कोणताही संघ रोखू शकला नाही. परंतु काल झालेल्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी रबाडाचा विजयरथ रोखला. विशेष म्हणजे त्याची गोलंदाजी चांगलीच फोडून काढली. रबाडाने टाकलेल्या चार षटकात हैदराबादच्या फलंदाजांनी सात चौकार आणि दोन षटकार ठोकले.
रबाडा 2017 पासून आतापर्यंत आयपीएलमध्ये 25 सामने खेळला आहे. या 25 सामन्यांमध्ये त्याने प्रत्येक सामन्यात विकेट मिळवली आहे. यादरम्यान त्याने आयपीएलमध्ये सर्वात जलद 50 विकेट मिळवण्याचा कारनामा केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 12 सामन्यांमध्ये 23 विकेट मिळवल्या आहेत.
संबंधित बातम्या
India Tour Australia | रोहितला काय झालंय हे चाहत्यांना कळू द्या, सुनील गावसकर कडाडले
Australia Tour : सूर्यकुमारकडे निवड समितीचं पुन्हा दुर्लक्ष; हरभजन-मनोज तिवारी BCCI वर संतापले
IPL 2020 : हिटमॅन मैदानावर परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता
(IPL 2020 : Kagiso Rabada goes wicketless first time after IPL 2017 due to Wriddhiman Saha and David Warner)