दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 54 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात कोलकाताने राजस्थानवर 60 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) बॅटिंग करताना शून्यावर बाद झाला. मात्र दुसऱ्या डावात कार्तिकने विकेटकीपर म्हणून अप्रतिम कामगिरी केली. कार्तिकने स्टंपमागे राजस्थानच्या 4 फलंदाजांना कॅच आऊट केलं. यासह कार्तिकने विकेटकीपर म्हणून एका सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी केली. कार्तिकने स्टंपमागे बेन स्टोक्स, संजू सॅमसन, रियान पराग आणि राहुल तेवतिया या चौघांना कॅच घेत बाद केलं. यासह दिनेश कार्तिकने विक्रमाला गवसणी घातली. ipl 2020 kkr wicket keeper dinesh karthik makes record take most catches in ipl breaks mahendra singh dhoni record
दिनेश कार्तिकने विक्रमी कामगिरी केली. दिनेशने महेंद्रसिंह धोनीचा आयपीएलमध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम मोडित काढला. धोनीने आयपीएलमध्ये विकेटकीपर म्हणून 109 कॅच घेतल्या आहेत. तर कार्तिकने 110 कॅच घेण्याचा विक्रम केला आहे.
दिनेश कार्तिकने राजस्थानच्या 4 फलंदाजांना कॅच आऊट केलं. यामध्ये कार्तिकने बेन स्टोक्सचा अफालतून कॅच घेतला. कार्तिकने बेन स्टोक्सचा हवेत झेपावत एकहाती कॅच घेतला. या भन्नाट कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
WATCH – DK takes flight – catch unbelievable
Take a bow @DineshKarthik. Went full stretch to his left and grabbed a stunner. Terrific catch from DK. You can watch this over and over again.https://t.co/5ijCHFAzDm #Dream11IPL
— IndianPremierLeague (@IPL) November 1, 2020
कार्तिकने याआधी राजस्थानविरुद्धच 2018 मध्ये स्टंपमागे 4 खेळाडूंना बाद करण्याची कामगिरी केली होती. यामध्ये कार्तिकने 2 खेळाडूंना कॅच आऊट आणि 2 खेळाडूंना स्टंपिग केलं होतं.
कार्तिकने याआधी 2009 मध्ये अशीच कामगिरी केली होती. कार्तिक तेव्हा दिल्लीकडून खेळत होता. दिल्ली विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना खेळला जात होता. कार्तिकने या सामन्यात राजस्थानच्या एकूण 4 फलंदाजांना स्टंपमागे बाद केलं होतं. यामध्ये कार्तिकने 2 फलंदाजांना कॅच आऊट तर 2 फंलदाजांना स्टंपिग केलं होतं. दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये अशा प्रकाराची कामगिरी करणारा एकमेव विकेटकीपर ठरला आहे.
दिनेश कार्तिकला आयपीएलच्या 13 व्या मोसमात बॅटिंगने चमक दाखवता आली नाही. कार्तिकने या मोसमातील 14 एकूण सामन्यात 126.11 च्या स्ट्राईक रेटने तर 14.08 च्या सरासरीने 169 धावा केल्या. कार्तिकची 58 ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
संबंधित बातम्या :
IPL 2020, KKR vs RR : कोलकाताचा राजस्थानवर 60 धावांनी शानदार विजय
ipl 2020 kkr wicket keeper dinesh karthik makes record take most catches in ipl breaks mahendra singh dhoni record