दुबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 57 धावांनी मात करत आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मुंबईने दिल्लीला विजयासाठी 201 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र दिल्लीला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. मुंबईची अंतिम सामन्यात पोहचण्याची ही सहावी वेळ ठरली आहे. या सामन्यात मुंबईचा विजय झाला असला तरी, कर्णधार असलेल्या हिटमॅन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर नकोसा विक्रम झाला आहे. या सामन्यात रोहित गोल्डन डक (Golden Duck) झाला. गोल्डन डक म्हणजेच पहिल्याच चेंडूवर बाद होणं. पहिल्या चेंडूवर बाद झाल्याने रोहितच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद झाली आहे. ipl 2020 mi vs dc qualifier 1 hitman rohit sharma 13 times out at ducks in ipl leveled with Parthiv Patel and Harbhajan Singh
रोहितला दिल्लीचा फिरकीपटू रवीचंद्रन आश्विनने (Ravichandran Ashwin) एलबीडबल्यू बाद केलं. यासह रोहितने आयपीएलमध्ये 13 वेळा शून्यावर बाद होण्याची निराशाजनक कामगिरी केली आहे. यासह रोहितने हरभजन सिंह (Harbhajan Singh) आणि पार्थिव पटेलची (Parthiv Patel) बरोबरी केली आहे. पार्थिव आणि हरभजन हे दोघे प्रत्येकी 13 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. रोहितला या मोसमात सातत्याने चांगली खेळी करता आलेली नाही.
Most ducks in IPL – Rohit is leveled with Parthiv Patel and Harbhajan Singh. pic.twitter.com/7z3t2z2siX
— Johns. (@CricCrazyJohns) November 5, 2020
रोहित शर्माला प्लेऑफ, सेमीफाइनल, फायनल आणि बाद फेरीतील सामन्यात विशेष कामगिरी करता आलेली नाही. रोहितला आतापर्यंत आयपीएलमधील सेमीफायनल/ फायनल / प्लेऑफमधील एकूण 19 डावांमध्ये केवळ 229 धावाच करता आल्या आहेत. यामध्ये रोहितला केवळ एकदाच अर्धशतकी खेळी करता आली आहे. तर रोहित महत्वाच्या सामन्यात 3 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
Rohit Sharma in IPL Play-offs :
Innings – 19
Runs – 229
Average – 12
Strike Rate – 101Big Game Player Rohit Sharma
— Pranjal (@Pranjal_one8) November 5, 2020
रोहितने आयपीएलच्या 13 व्या मोसमात आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 264 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
क्वालिफायर 1 च्या या सामन्यात एकूण 6 खेळाडू शून्यावर बाद झाले. यामध्ये मुंबई इंडियन्सचे एकूण 2 फलंदाज शून्यावर बाद झाले. तर दिल्ली कॅपिटल्सचे एकूण 4 बॅट्समन झिरोवर आऊट झाले.
दिल्लीला पराभवानंतरही अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. 6 नोव्हेंबरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात एलिमिनेटर (Eliminator 2020) सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ 8 नोव्हेंबरला दिल्लीविरुद्ध क्वालिफायर 2 (Qualifier 2) सामन्यात भिडणार आहे. त्यामुळे दिल्लीला मुंबईविरुद्धच्या पराभवानंतरही फायनलमध्ये पोहचण्यासाठी संधी मिळणार आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020 | बीसीसीआयकडून प्ले-ऑफचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ ठिकाणी होणार अंतिम सामना
IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?
ipl 2020 mi vs dc qualifier 1 hitman rohit sharma 13 times out at ducks in ipl leveled with Parthiv Patel and Harbhajan Singh