IPL 2020, MI vs RCB : सूर्यकुमार यादवची धमाकेदार खेळी, मुंबईची बंगळुरुवर 5 विकेट्सने मात, प्ले ऑफमध्ये धडक

| Updated on: Oct 28, 2020 | 11:25 PM

या विजयासह मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे.

IPL 2020, MI vs RCB : सूर्यकुमार यादवची धमाकेदार खेळी, मुंबईची बंगळुरुवर 5 विकेट्सने मात, प्ले ऑफमध्ये धडक
Follow us on

अबुधाबी : सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) तडाखेदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Banglore) 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 5 चेंडूआधी पूर्ण केलं. मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 166-5 धावा केल्या. सूर्यकुमार यादव मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. सूर्यकुमारने सर्वाधिक नाबाद 79 धावांची शानदार खेळी केली. तर बंगळुरुकडून मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

विजयी आव्हानचं पाठलाग करायला आलेल्या मुंबईची सावध सुरुवात झाली. क्विंटन डी कॉक आणि इशान किशनने पहिल्या विकेटसाठी 37 धावा जोडल्या. क्विंटनच्या रुपात मुंबईला पहिला धक्का लागला. क्विंटन 18 धावांवर बाद झाला. यानंतर मुंबईची 52 धावसंख्या असताना दुसरा धक्का लागला. इशान किशन 25 रन्सवर आऊट झाला. मुंबईने तिसरी विकेटही 72 धावांवर गमावली. सौरभ तिवारी 5 धावा करुन माघारी परतला. कृणाल पांड्या मोठा फटका मारण्याच्या नादात 10 धावांवर तंबूत परतला. यामुळे मुंबईची स्थिती 107-4 अशी झाली.

मात्र यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने मुंबईचा डाव सावरला. यादरम्यान सूर्यकुमारने फटकेबाजी केली. यामध्ये त्याने अर्धशतक झळकावलं. हार्दिक-सूर्यकुमारने पाचव्या विकेटसाठी 51 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. हार्दिक 17 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार कायरन पोलार्ड मैदानात आला. सूर्यकुमारने चौकार ठोकत मुंबईला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारने 43 चेंडूत 10 चौकार आणि 3 सिक्ससह नाबाद 79 धावांची धमाकेदार खेळी केली. तर पोलार्ड 4 धावांवर नाबाद राहिला. बंगळुरुकडून मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. ख्रिस मॉरीसने 1 विकेट घेतली.

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडले. बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. बंगळुरुकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. तर जोश फिलिपने 33 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट, राहुल चाहर आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी 1 विकेट घेतली. IPL 2020 MI vs RCB Live Score Update Today Cricket Match Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live लाईव्ह स्कोअर

[svt-event title=”मुंबईचा बंगळुरुवर शानदार विजय” date=”28/10/2020,11:16PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईला पाचवा धक्का” date=”28/10/2020,10:55PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 12 चेंडूत 16 धावांची गरज” date=”28/10/2020,10:50PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईला विजयसाठी 3 ओव्हरमध्ये 27 धावांची आवश्यकता” date=”28/10/2020,10:44PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 24 चेंडूत 35 धावांची गरज” date=”28/10/2020,10:38PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सूर्यकुमारचे दणदणीत अर्धशतक” date=”28/10/2020,10:33PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 58 धावांची आवश्यकता” date=”28/10/2020,10:27PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईला चौथा धक्का” date=”28/10/2020,10:25PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईला तिसरा धक्का” date=”28/10/2020,10:13PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 60 चेंडूत 95 धावांची आवश्यकता” date=”28/10/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”9 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर” date=”28/10/2020,10:03PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईला दुसरा झटका” date=”28/10/2020,9:58PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर मुंबई” date=”28/10/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईला पहिला धक्का” date=”28/10/2020,9:47PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”4 ओव्हरनंतर मुंबई” date=”28/10/2020,9:40PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबई इंडियन्सचा 2 ओव्हरनंतर स्कोअर” date=”28/10/2020,9:34PM” class=”svt-cd-green” ] IPL 2020, MI vs RCB Live : मुंबई 15-0 (2 Over) क्विंटन डी कॉक-4*, इशान किशन-11* [/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान” date=”28/10/2020,9:08PM” class=”svt-cd-green” ] देवदत्त पडीक्कलची 74 धावांची खेळी [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला सहावा धक्का” date=”28/10/2020,9:01PM” class=”svt-cd-green” ] ख्रिस मॉरिस 4 धावा करुन माघारी [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला पाचवा धक्का” date=”28/10/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ] देवदत्त पडीक्कल 74 धावांवर आऊट [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला चौथा धक्का” date=”28/10/2020,8:49PM” class=”svt-cd-green” ] शिवम दुबे 2 रन्सवर आऊट [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला तिसरा धक्का” date=”28/10/2020,8:40PM” class=”svt-cd-green” ] एबी डी व्हीलियर्स 15 धावांवर बाद [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचा 13 ओव्हरनंतर स्कोअर” date=”28/10/2020,8:31PM” class=”svt-cd-green” ] बंगळुरु 100-2 (13Over) देवदत्त पडीक्कल-55*, एबी डी व्हीलियर्स-2* [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला दुसरा धक्का” date=”28/10/2020,8:22PM” class=”svt-cd-green” ] https://www.facebook.com/20531316728/posts/10154009990506729/ [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का” date=”28/10/2020,8:13PM” class=”svt-cd-green” ] जोश फिलिप 33 धावांवर आऊट [/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर बंगळुरुचा स्कोअर” date=”28/10/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सलामी अर्धशतकी भागीदारी” date=”28/10/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरु 3 ओव्हरनंतर” date=”28/10/2020,7:45PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात” date=”28/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”बंगळुरु प्लेइंग इलेव्हन” date=”28/10/2020,7:10PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”असा आहे मुंबईचा संघ” date=”28/10/2020,7:09PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुंबईने टॉस जिंकला” date=”28/10/2020,7:08PM” class=”svt-cd-green” ]

प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी या दोन्ही संघाना केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे हा सामना जिंकून प्ले ऑफमध्ये पोहचण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल. या मोसमात हे उभय संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. या आधी या मोसमात बंगळुरु आणि मुंबई 29 सप्टेंबरला भिडले होते. या सामन्यात बंगळुरुने मुंबईचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता.

हेड टु हेड

आयपीएलमध्ये आतापर्यंत बंगळुरु आणि मुंबई एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये मुंबईचा बोलबाला राहिला आहे. मुंबईने बंगळुरुला एकूण 16 वेळा पराभूत केलं आहे. तर बंगळुरुला 10 मॅचेस जिंकण्यात यश आले आहे. मुंबई आणि बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुंबई आणि बंगळुरुचे प्रत्येकी 14 पॉइंट्स आहेत.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कुल्टर नाईल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुर : अॅरॉन फिंच, देवदत्त पडीक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डी व्हीलियर्स, गुरकीरत सिंह, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अॅडम झॅम्पा, इसुरु उडाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RCB vs MI, Super Over Update : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर मात

IPL 2020 MI vs RCB Live Score Update Today Cricket Match Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live