दुबई : चेन्नई सुपर किंग्जसने रविवारी (25 ऑक्टोबर) डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात बंगळुरुचा 8 विकेट्सने पराभव केला. बंगळुरुला प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी एका विजयाची गरज होती. मात्र ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरुचा पराभव झाला. या सामन्यादरम्यान बंगळुरुला एक झटका बसला. बंगळुरुचा स्टार गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे बंगळुरुच्या चिंतेत भर पडली आहे. IPL 2020 RCB Navdeep Saini Injured His Right Thumb Uncertainty About Playing In Next Match
बंगळुरुचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीच्या बोटाला चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील 18 व्या ओव्हरमध्ये दुखापत झाली. सैनीच्या उजव्या हाताच्या अंगठ्या आणि बोटामधील त्वचा फाटली. त्यामुळे सैनीला मैदान सोडून जावे लागले. इजा झालेल्या ठिकाणी बंगळुरुचे फिजीओ इवान स्पीचलीने टाके मारले. बंगळुरु आगामी सामना 28 ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे. यासामन्यात सैनी खेळणार की नाही, हे निश्चित नाही. त्यामुळे बंगळुरुच्या चिंतेत भर पडली आहे.
“2016 साली अशाच प्रकारे विराट कोहलीला दुखापत झाली होती”, अशी माहिती फिजीओ स्पीचलीने दिली. “तेव्हा विराटच्या हाताला एकूण 9 टाके पडले होते. मात्र यानंतर विराट मैदानात उतरला होता. विराट-सैनीच्या दुखापतीची तुलना करणं योग्य नाही”, असंही यावेळी स्पीचलीने नमूद केलं.
नवदीपने यंदाच्या मोसमात 11 सामन्यात एकूण 5 विकेट्स घेतल्या आहेत. विकेट्स कमी घेतले असले तरी सैनी फलंदाजांना आपल्या बोलिंगवर मोठे फटके मारु देत नाहीये. दरम्यान मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी सैनीची दुखापत ठीक झाली नाही, तर त्याजागी उमेश यादव आणि शाहबाज अहमदला संधी मिळू शकते.
बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. बंगळुरु यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत. यापैकी 7 सामन्यात बंगळुचा विजय झाला आहे. तर 4 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले.
संबंधित बातम्या :
Ben Stokes | आयपीएलमधील दुसरी नाबाद शतकी खेळी, बेन स्टोक्सचा पराक्रम, ठरला एकमेव खेळाडू
IPL 2020 RCB Navdeep Saini Injured His Right Thumb Uncertainty About Playing In Next Match