दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 31 वा सामना गुरुवारी किंग्जस इलेव्हन पंजाब विरुद्ध (Kings XI Punjab) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळण्यात आला. या अटीतटीच्या सामन्यात पंजाबने शेवटच्या चेंडूवर बंगळुरुचा पराभव केला. यासह पंजाबने या मोसमातील दुसरा विजय साजरा केला. या सामन्यादरम्यान बंगळुरुचा फिरकीपटी युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एक विकेट घेतली. यासह चहलने मानाच्या पंगतीत स्थान मिळवले आहे. ipl 2020 rcb spinner yuzvendra chahal completes 200 wickets in T20 cricket
A milestone achieved and a record set. ?@yuzi_chahal#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers #Dream11IPL pic.twitter.com/sRguYnH8uo
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) October 16, 2020
बंगळुरुने पंजाबला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना पंजाबच्या लोकेश राहुल आणि मयंक अगरवालने चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी युजवेंद्रने मोडित काढत पंजाबला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने मयंक अगरवालला 45 धावांवर बोल्ड केलं. मयंकची ही विकेट चहलच्या टी 20 कारकिर्दीतील 200 विकेट ठरली. यासह 200 विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा चहल 5 वा भारतीय फिरकीपटू ठरला. टी 20 मध्ये सर्वात आधी 200 विकेट्स घेण्याची कामगिरी पियूष चावलाने केली. चावलाच्या नावावर टी 20 मध्ये 257 विकेट्सची नोंद आहे. चहलने या सामन्यात एकूण 3 ओव्हरमध्ये 35 धावा देत 1 विकेट घेतली.
पंजाबने बंगळुरुचा 8 विकेटने पराभव केला. मात्र बंगळुरुने हा सामना पंजाबला सहजासहजी जिंकू दिला नाही. बंगळुरुने हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजेच 6 चेंडूत विजयासाठी अवघ्या 2 धावांची आवश्यकता होती. मैदानात ख्रिस गेल आणि लोकेश राहुल ही सेट जोडी होती. त्यामुळे पंजाब सहज जिंकेल असं वाटत होतं.
ICYMI – Chahal bowls a thrilling last over.
2 needed off the last over. Yuzvendra Chahal comes to bowl. Almost defends it – how thrilling could it get? Watch the nail-biting final over here.https://t.co/uygsaVL5Jj #Dream11IPL
— IndianPremierLeague (@IPL) October 15, 2020
मात्र चहलने आपल्या फिरकीच्या जोरावर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. चहलने पहिले 2 चेंडू डॉट टाकले. तिसऱ्या चेंडूवर गेलने 1 धावा काढली. चौथ्या चेंडू लोकेश राहूलने डॉट केला. त्यामुळे पंजाबला 2 चेंडूत 1 धावेची गरज होती. 5 व्या चेंडूवर राहूलने 1 चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ख्रिस गेल स्ट्राईक एंडवर रनआऊट झाला. त्यामुळे पंजाबला शेवटच्या चेंडूवर 1 धाव हवी होती. मात्र मैदानात आलेल्या निकोलस पूरनने षटकार ठोकत पंजाबला विजय मिळवून दिला. या विजयासह पंजाबचा या मोसमातील दुसरा विजय ठरला.
ipl 2020 rcb spinner yuzvendra chahal completes 200 wickets in T20 cricket