IPL 2020, SRH vs KKR : डेव्हिड वॉर्नरच्या आयपीएलमध्ये वेगवान 5 हजार धावा, विराट कोहलीला पछाडलं

| Updated on: Oct 18, 2020 | 11:13 PM

डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या यंदाच्या 13 व्या मोसमात दमदार कामगिरी करतोय.

IPL 2020, SRH vs KKR : डेव्हिड वॉर्नरच्या आयपीएलमध्ये वेगवान 5 हजार धावा, विराट कोहलीला पछाडलं
Follow us on

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) 35 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या मोसमातील ही तिसरी सुपर ओव्हर मॅच ठरली. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 163 धावा केल्या. तर हैदराबादलाही प्रत्युतरात 6 विकेट गमावून 163 धावाच करता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. यानंतर कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला. IPL 2020 Sunrisers Hyderabad David Warner Completes Fastest 5,000 Runs In IPL Breaks Virat Kohli’s Record

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) नाबाद 33 चेंडूत 47 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार लगावले. वॉर्नरला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. मात्र वॉर्नरने याखेळीसह एक अफलातून कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा वॉर्नर हा पहिलाच विदेशी फलंदाज ठरला आहे. तसेच वॉर्नरने विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे.

काय आहे रेकॉर्ड?

वॉर्नरने आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. यासोबत वॉर्नर अशी कामगिरी करणारा पहिला विदेशी फलंदाज ठरला आहे. तसेच ओव्हरऑल चौथा फंलदाज ठरला. आयपीएलमध्ये सर्वात आधी 5 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने केली आहे. तर यानंतर सुरेश रैना आणि रोहित शर्मानेही हा कारनामा केला आहे.

विराटला पछाडलं

वॉर्नरने 5 हजार धावा 135 डावात पूर्ण केल्या आहेत. तर विराटने 147 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्यामुळे वेगवान 5 हजार धावा करण्याच्या बाबतीत वॉर्नरने विराटला पछाडलं आहे.

डेव्हिड वॉर्नरची आयपीएल कारकिर्द

डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 135 सामने खेळले आहेत. या 135 सामन्यात वॉर्नरने 43.05 च्या सरासरीने 141.05 च्या स्ट्राईक रेटने 5 हजार 37 धावा केल्या आहेत. यात 4 दमदार शतक आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच वॉर्नर यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी करतो. वॉर्नर सातत्याने धावा करतोय. वॉर्नरने या मोसमातील 9 सामन्यात 331 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये 5 हजार धावा करणारे फलंदाज

विराट कोहली- 5 हजार 759 रन्स

सुरेश रैना- 5 हजार 368 धावा

रोहित शर्मा- 5 हजार 157 धावा

डेव्हिड वॉर्नर- 5 हजार 37 रन्स

हैदराबादची यंदाच्या मोसमातील कामगिरी

सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या 13 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. या 9 सामन्यांपैकी 3 सामन्यात हैदराबादचा विजय झाला आहे. तर 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबाद 6 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, SRH vs KKR Super Over : सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय

IPL 2020 | चेन्नईला मोठा धक्का, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकणार

IPL 2020 Sunrisers Hyderabad David Warner Completes Fastest 5,000 Runs In IPL Breaks Virat Kohli’s Record