दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL2020) मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने मात केली. यासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामिगिरी केली. या मोसमात दिल्लीला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं. तर हैदाराबादला तिसऱ्या आणि बंगळुरुला चौथ्या क्रमांकावर समाधान मानवं लागलं. 3 वेळेस विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईचं साखळी फेरीतच आव्हान संपु्ष्टात आलं. निराशाजनक सुरुवातीनंतर पंजाबने चांगले कमबॅक केलं. मात्र चेन्नईने पराभूत केल्यानं पंजाबचं आव्हान संपुष्टात आलं. आयपीएलचा हा मोसमात अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. यापैकी काही खेळाडूंनी कायम लक्षात राहिल अशी उल्लेखनीय कामगिरी केली. अशी कामगिरी केलेल्या टॉप 10 खेळाडूंची या मोसमातील कामगिरी आपण पाहणार आहोत. ipl 2020 top 10 super Performers in the 13th season of ipl
किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab) कर्णधार के एल राहुलची (K L Rahul Orangre Cap Holer In IPL 2020 ) बॅट या मोसमात चांगलीच तळपली. के एल या मोसमातील ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. केएलने 55. 83 च्या स्ट्राईक रेटने या मोसमात एकूण 670 धावा केल्या. केएलने पंजाबला अनेकवेळा सलामीवीर म्हणून चांगली सुरुवातही मिळवून दिली. तसेच केएल मागील 2 मोसमापासूनचा टॉप स्कोरर राहिला आहे.
केएलने मागील दोन वर्षात 593 आणि 659 धावा केल्या आहेत. सुरुवातीच्या 7 पैकी 6 सामन्यात पंजाबचा पराभव झाला. मात्र यानंतर पंजाबने दमदार कमबॅक केलं. मात्र पंजाबला साखळी फेरीतील अंतिम सामन्यात चेन्नईने पराभूत केलं. यामुळे पंजाबचं आव्हान संपुष्टात आलं. केएलने या मोसमात केलेल्या कामगिरीचं बक्षिस निवड समितीनं दिलं. केएलला उप कर्णधारपदी बढती देण्यात आली आहे. केएल ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी 20 मालिकेत उप कर्णधार पदाची जबाबदारी पार पाडणार आहे.
डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आपल्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) या मोसमात एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवून दिला. वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबादने या मोसमात तिसरा क्रमांक पटकावला. सलग 4 विजय मिळवत हैदराबादने क्वालिफायर 2 म्हणजेच सेमीफायनल 2 चं तिकीट मिळवलं. मात्र दिल्लीने पराभूत केल्यानं हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलं. वॉर्नरने सलग सहा मोसमात सातत्याने 500 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू ठरला. तसेच सर्वात कमी डावांमध्ये वेगवान 5 हजार धावा करणारा तसेच पहिला विदेशी फलंदाज ठरला.
थंगारासू नटराजनने (Thanagarasu Natrajan) या मोसमात हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत चांगली गोलंदाजी केली. थंगारासूने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 16 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या. तसेच नटराजन या मोसमात सर्वाधिक यॉर्कर चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला. थंगारासुने सर्वाधिक यॉर्कर टाकण्याचा विक्रम थंगारासुने आपल्या नावे केला.
थंगारासुने या मोसमात एकूण 54 वेळा यॉर्कर बॉल टाकला. तसेच कोलकाता फिरकीपटु वरुण चक्रवर्थीला दुखापत झाली. यामुळे त्याच्या जागी थंगारासूला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली आहे. थंगारासूला नुकतेच कन्यारत्न प्राप्त झालं आहे.
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals)आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारण्याची ही पहिलीच वेळ ठरली. अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी यामध्ये दिल्लीच्या सर्वच खेळाडूंची महत्वाची भूमिका राहिली. मात्र वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) असाधारण कामगिरी केली. तो या मोसमातील पर्पल कॅपचा (Kagiso Rabda Purple Cap Holder IPL 2020) मानकरी ठरला. एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. रबाडाने या मोसमात 17 सामन्यात एकूण 30 विकेट्स घेतल्या.
दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) शिखर धवनने (Shikhar Dhawan) या मोसमात तडाखेदार फलंदाजी केली. शिखरने या मोसमात एकूण 618 धावा केल्या. शिखरला अंतिम सामन्यात ऑरेंज कॅप पटकावण्याची संधी होती. मात्र कमी धावांवर बाद झाल्याने ही संधी हुकली. शिखरने या मोसामात एक पराक्रम केला. आयपीएलच्या इतिहासात कोणालाच न जमलेला पराक्रम त्याने केला. सलग 2 सामन्यात शतक लगावण्याची कामगिरी त्याने केली. दरम्यान तो यावेळेस 4 वेळा शून्यावर देखील बाद झाला.
देवदत्त पडीक्कलचं (Devdutt Padikkal)आयपीएलमधील हे पहिलचं वर्ष. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) त्याला आपल्या संघात समाविष्ठ केलं. देवदत्तने या संधीचं सोनं केलं. या पहिल्या वर्षात देवदत्तने अफलातून कामगिरी केली. त्याने या मोसमात शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यासारख्या फलंदाजांचा विक्रम मोडित काढला. देवदत्त या मोसमात सर्वाधिक धावा करणारा दुसरा अनकॅप्ड खेळाडू ठरला. अनकॅप्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाकडून खेळण्याची संधी न मिळालेला खेळाडू. देवदत्तने या मोसमात एकूण 15 सामन्यात 473 धावा केल्या.
पुण्याच्या मराठमोळ्या खेळाडूला चेन्नईने आपल्या ताफ्यात सामावून घेतलं. ऋतुराजची आयपीएलमध्ये खेळण्याची पहिलीच वेळ. मात्र मोसमाच्या सुरुवातीआधीच त्याला कोरोनाची लागण झाली. यानंतर तो यातून सावरला. त्याला काही सामन्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. ऋतुराज सलग 2 वेळा शून्यावर बाद झाला. मात्र यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्याने पुढील 3 सामन्यात सलग अर्धशतकी खेळी केली. त्याने यासह वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली. यासह चेन्नईला नवा स्टार खेळाडू मिळाला.
कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळणाऱ्या फिरकीपटू वरुण चक्रवर्थीने (Varun Chakravarthy) चांगली खेळी केली. फिरकीपटू कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav)जागेवर वरुणला संघात स्थान देण्यात आलं. वरुणने या मोसमात एकूण 13 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या. 20 धावा देऊन 5 विकेट्स ही त्याची या मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. त्याने ही कामगिरी दिल्लीविरुद्ध केली. वरुणची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे त्याला या दौऱ्याला मुकावे लागले आहे.
मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणाऱ्या इशान किशनने (Ishan Kishan) या मोसमात चमकदार खेळी केली. फलंदाज सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) दुखापतग्रस्त झाल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. त्याने या मोसमातील एकूण 14 सामन्यात 516 धावा केल्या. तसेच त्याने एका मोसमात सर्वाधिक सिक्स खेचण्याची कामगिरीही केली. इशानने या मोसमात एकूण 30 सिक्स (Most Sixs in IPL 2020) लगावले. तसेच इशानने अंतिम सामन्यात 33 धावांची महत्वपूर्ण नाबाद खेळी केली.
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह ( Yorker KingvJasprit Bumrah) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार गोलंदाज. त्याने या मोसमात एकूण 15 सामन्यात एकूण 27 विकेट्स घेतल्या. बुमराह आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. मात्र बुमराह अंतिम सामन्यात विकेट्स घेण्यास अपयशी ठरला.
संबंधित बातम्या :
IPL 2021 | आयपीएलच्या नव्या मोसमात नवी टीम दिसण्याची शक्यता, बीसीसीआयची जोरदार तयारी
IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?
IPL 2020 | नजफगढचा नवाब वीरेंद्र सेहवागची आयपीएल 2020 मधील ड्रीम टीम, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी निवड
ipl 2020 top 10 super Performers in the 13th season of ipl