यूएई : आयपीएलच्या 13 व्या हंगामाला अवघे काही तास उरले आहेत. प्रत्येक संघ जोमाने सराव करत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुही सराव करत आहे. RCB ने आपल्या संघात सरावासाठी संयुक्त अरब अमिरातीचा क्रिकेट कर्णधाराचा आणि एका खेळाडूचा समावेश केला आहे. ( UAE 2 Player help To Rcb During practise session)
यूएईचा कर्णधार अहमद रझा आणि युवा खेळाडू कार्तिक मयप्पन या दोघांना सरावासाठी RCB ने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. कोरोना परिस्थितीमुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. आरसीबीचा आयपीएलच्या 13 व्या हंगामातील पहिला सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 21 सप्टेंबरला होणार आहे.
अहमद रझाने 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. ही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर रझा सरावासाठी मैदानात उतरला. आरसीबीचे बोलिंग कोच श्रीधरन यांच्या शिफारशीनंतर फिरकीपटू रझाला बोलवण्यात आलं.
या दोन्ही खेळाडूंना यूएईमधील परिस्थितीची माहिती आहे. खेळपट्ट्यांची जाण आहे. त्यामुळे या दोन खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा निश्चितच फायदा होईल, अशी आरसीबीची धारणा आहे.
“माझी आरसीबीच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांसोबत ओळख करुन दिली. श्रीराम यांच्याकडून स्वत:बद्दल ऐकून चांगलं वाटलं. आरसीबीचा स्फोटक खेळाडू एबी डिव्हिलियर्सने माझे आभार मानले. एबीसारखा मोठा खेळाडू जेव्हा आपले आभार मानतो, तेव्हा यावर विश्वास बसत नाही”, असं अहमद रझा म्हणाला.
आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अपवाद वगळता उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. आरसीबीकडे विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलसारखे अनुभवी आणि आक्रमक बॅट्समन आहेत. टीमला निर्णायक क्षणी विजय मिळवून देण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये आहे. मात्र तरीही आतापर्यंत आरसीबीला आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करता आलेली नाही.
अहमद रझाची कारकिर्द
अहमद रझा मागील 6 वर्षांपासून यूएईचं प्रतिनिधित्व करतोय. रजा 32 वन-डे आणि 40 टी-20 सामने खेळला आहे. रजाने अनुक्रमे 36 आणि 28 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. ( UAE 2 Player help To Rcb During practise session)
संबंधित बातम्या :
IPL 2020 | सलामीच्या लढतीत धोनीच्या चेन्नईपेक्षा रोहितची मुंबई भारी, गौतम गंभीरला विश्वास
मालवणचो झील दर्शन बांदेकर ‘मुंबई इंडियन्स’मध्ये
IPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर, मुंबई इंडियन्स ‘या’ संघासोबत सलामीला भिडणार