मुंबई : इंडियन प्रीमअर लीगची (IPL 2021) सगळ्या संघांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारतीय संघाचे जवळपास सगळे खेळाडू इंग्लंडविरुद्धची मालिका संपवून आयपीएलमधल्या आपापल्या फ्रॅचायझींत दाखल झाले आहेत. संघाचे ट्रेनिंग कॅम्पदेखील सुरु झाले आहेत. आयपीएलचा हंगाम सुरु होण्यास आता फक्त 9 दिवस बाकी असताना 4 फ्रेंचायझींचं टेन्शन थोडंस वाढलं आहे आणि हे टेन्शन वाढलंय पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Sa vs Pak) यांच्यातील एकदिवसीय मालिकेमुळे…! (IPL 2021 5 South African Players Miss 1st Ipl match MI DC Csk RR)
पाकिस्तानविरुद्धच्या सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे क्विंटन डिकॉक (quinton de kock), कागिसो रबाडा (kagiso rabada), एनरिक नॉर्खिया (anrich nortje), डेव्हिड मिलर (david miller) आणि लुंगी एनगिडी (lungi ngidi) हे खेळाडू खेळत आहेत. मात्र पाकमध्ये तिकडे मालिका सुरु असल्याने ह्या खेळाडूंना आयपीएलची पहिली मॅच खेळता येणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 2 एप्रिलपासून सुरू होईल. पहिला सामना 2 एप्रिल, दुसरा सामना 4 एप्रिल रोजी खेळला जाईल, तर शेवटचा सामना 7 एप्रिल रोजी खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेने आयपीएलमध्ये खेळणार्या खेळाडूंना दुसर्या वनडेनंतर मालिका सोडण्याची परवानगी दिली आहे. असं असूनही, खेळाडूंना आयपीएलच्या पहिल्या सामन्यांमध्ये खेळणे अवघड आहे. कारण पाकमधून परतल्यानंतर खेळाडूंना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एक आठवडा क्वारंटाईन रहावं लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची अनुपस्थिती दिल्लीला अधिक जाणवेल. कारण गोलंदाजीचं आक्रमण सांभाळणारे कागिसो रबाडा आणि नॉर्खिया हे कदाचित पहिली मॅछ खेळू शकणार नाही. 10 एप्रिलपर्यंत हे दोन्ही खेळाडू त्यांचा क्वारंटाईन पिरीयड पूर्ण करतील, अशी शक्यता आहे. संघाची पहिली लढत सीएसकेविरुद्ध आहे.
दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका मुंबई इंडियन्सलाही बसणार आहे. क्विंटन डी कॉकने पाठीमागच्या हंगामात मुंबईसाठी खेळताना आक्रमक सुरुवात करुन मुंबईला समाधानकारक ओपनिंग पार्टनरशीप करुन दिल्या तसंच मुंबईसाठी काही यादगार इनिंग खेळल्या. असं असलं तरी टीमजवळ पर्यायांची कमी नाहीय. मुंबईची पहिली मॅच 9 एप्रिल रोजी रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे.
इनसाईड्स स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, चेन्नईच्या सीएओंनी सांगितलंय की आफ्रिकेचा गलदगती गोलंदाज लिंगी एनगिडी 10 एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही.
राजस्थानकडून खेळण्यास उत्सुक असणाऱ्या डेव्हिड मिलरच्या रुपाने राजस्थानालाही थोडासा फटका बसला आहे. परंतु गेल्या हंगामात पंजाबकडून मिलरने केवळ 2 मॅच खेळल्या होत्या. तसंच त्याचा सध्याचा फॉर्मही खराब सुरु आहे.
(IPL 2021 5 South African Players Miss 1st Ipl match MI DC Csk RR)
हे ही वाचा :
IPL 2021 : “मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन”
IPL 2021 : चौथ्या अंपायरची ताकद वाढली, 90 मिनिटात खेळ संपवण्याचे बंधन, IPL साठी BCCI चे नवे नियम