मुंबई : लोकप्रिय टी 2o स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या (Ipl 2021 Schedule) वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने (bcci)ट्विद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. विशेष म्हणजे या मोसमाचं आयोजन भारतात करण्यात आलं आहे. कोरोनामुळे आयपीएलचं 13 वं पर्व यूएईमध्ये खेळवण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे हे सामने विनाप्रेक्षकांच्या रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले गेले होते. यावेळेस आयपीएल भारतात खेळवण्यात येणार असणाऱ्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पण चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार नाहीये. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. (ipl 2021 all matches played without cricket fans in stadium)
#VIVOIPL is back in India ?? ?
Time to circle your favorite matches on the calendar ?️
Which clashes are you looking forward to the most? ? pic.twitter.com/kp0uG0r9qz
— IndianPremierLeague (@IPL) March 7, 2021
“या मोसमातील सर्व सामने हे बंद दाराआड खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी नसणार आहे. किमान सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात तरी परवानगी नसेल. मात्र त्यानंतर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो”, असं बीसीसीआयने (bcci) आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे. त्यामुळे तुर्तास तरी क्रिकेट चाहत्यांना आपल्या टीव्ही बॉक्सवरुनच या मॅचेसचा आनंद घ्यावा लागणार आहे.
कोरोना संसर्गानंतर अनेक क्रिकेट स्पर्धा या विनाप्रेक्षक खेळवण्यात आल्या आहेत. तर अपवादात्मक स्पर्धेत 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. कोणालाही संसर्गं होऊ नये, यासाठी बीसीसीआय आणि स्थानिक क्रिकेट बोर्डाकडून त्या त्या स्टेडियममध्ये खेळाडूंसह क्रिकेट प्रेमींच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात येत आहे.
या पर्वातील पहिला सामना 9 मार्चला चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. या सलामीच्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आमनेसामने असणार आहे.
साखळी फेरीत एकूण 56 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या 6 शहरात पार पडणार आहेत. चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरुमध्ये प्रत्येकी 10-10 सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दिल्ली आणि अहमदाबादमध्ये प्रत्येकी 8-8 सामने खेळवण्यात पार पडणार आहेत.
या पर्वात एकूण 11 डबल हेडर मॅच खेळवण्यात येणार आहेत. डबल हेडर म्हणजेच एकाच दिवसात 2 सामने. साधारणपणे हे डबल हेडर सामने शनिवार आणि रविवारी खेळवण्यात येतात. डबल हेडरमधील पहिल्या सामन्याला दुपारी 3. 30 वाजता सुरुवात होणार आहे. तर दिवसातील दुसऱ्या सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
संबंधित बातम्या :
(ipl 2021 all matches played without cricket fans in stadium)