IPL 2021 Auction Rules चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील खेळाडूंसाठीची लिलाव प्रक्रिया (IPL 2021 Auction) आज होत आहे. बोली प्रक्रियेच्या कार्यक्रमाला चेन्नईतील हॉटेल ग्रॅंड चोलामध्ये गुरुवारी 18 फेब्रुवारी दुपारी 3 पासून सुरुवात होणार आहे. या मिनी ऑक्शनमध्ये (Ipl Mini Auction 2021) एकूण 292 पैकी 62 खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. या 62 खेळाडूंवर 8 संघांची नजर असणार आहे. (ipl 2021 auction rules 6 important rules for dc rr kxp mi rcb srh kkr csk)
आयपीएल 2021 च्या लिलावाच्या एक दिवसआधी सर्व फ्रँचायझीशी संबंधित व्यक्ती चेन्नईत पोहोचले आहेत. महेंद्रसिंह धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग चेन्नई सुपर किग्ंजसकडून (Chennai Super Kings) या लिलावाच्या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच रिकी पॉन्टिंग आणि कॅप्टन श्रेयस अय्यर हजर नसतील. या दोघांच्या जागी असिस्टंट कोच असलेला मोहम्मद कैफ हा या मिनी ऑक्शनसाठी उपस्थित असणार आहे. दरम्यान या लिलाव प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सर्व फ्रँचायजींना आयपीएल प्रशासनाच्या 6 नियमांचं पालन करावं लागणार आहे.
कोणत्याही फ्रँचायजीला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रक्कमेपेक्षा अधिक बोली लावता येणार नाही. आयपीएल 2021 च्या लिलावासाठी चेन्नईकडे 19.9 कोटी, दिल्लीकडे 12.9 कोटी, पंजाबकडे 53.2 कोटी, कोलकाताकडे 10.75 कोटी, मुंबईकडे 15.35 कोटी, राजस्थानजवळ 34.85 कोटी, बंगळुरुकडे 35.9 कोटी तर हैदराबादजवळ 10 कोटी 75 लाख इतकी रक्कम उपलब्ध आहे. या नियमानुसार या सर्व फ्रँचायजींना या रक्कमेपेक्षा अधिक पैसे खर्च करण्याची परवानगी नसणार आहे.
BCCI आणि IPL गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार, सर्व फ्रँचायझींना एकूण रकमेच्या किमान 75 टक्के रक्कम ही खेळाडूंवर खर्च करणं बंधनकारक असणार आहे. कोणत्याही फ्रेंचायजीने 75 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम खर्च केल्यास उर्वरित रक्कम जप्त केली जाईल.
3 ) या वेळेस कोरोनामुळे मेगाऐवजी मिनी ऑक्शन कार्यक्रमाचं छोटेखानी आयोजन करण्यात आलं आहे. यामुळे फ्रँचायजींना खेळाडूंना रिटेन करण्यासाठी RTM म्हणजेच राईट टू मॅच कार्डचा वापर करता येणार नाही.
4) आयपीएलमधील सर्व फ्रँचायजींना आपल्या संघात किमान 18 तर कमाल 25 खेळाडू ठेवता येणार आहेत. म्हणजेच 18 पेक्षा कमी किंवा 25 जास्त खेळाडूंना ताफ्यात समाविष्ट करता येणार नाही.
5) एका संघात कॅप्ड आणि अनकॅप्डसह (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले खेळाडू) भारतीय खेळाडूंची संख्या किमान 17 आणि कमाल 25 पर्यंत असू शकते.
6) एका संघात जास्तीत जास्त 8 आंतरराष्ट्रीय खेळाडूंपेक्षा अधिक खेळाडू समाविष्ट करता येणार नाहीत.
यंदा कोरोनामुळे मेगा ऑक्शनऐवजी मिनी ऑक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. दर 3 वर्षांनी मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात येते. तर मिनी ऑक्शन त्या 3 वर्षात दरवर्षी होतो.
मेगा ऑक्शनच्या आधी प्रत्येक फ्रँचायजीला जास्तीत जास्तीत 5 खेळाडू रिटेन करता येतात. तर मिनी ऑक्शनमध्ये कितीही खेळाडू रिटेन (कायम) करु शकतो.
संबंधित बातम्या :